एक्स्प्लोर

ओम पुरी यांचे 10 गाजलेले सिनेमे

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. आपल्या दमदार अभिनयानं त्यांनी सिनेसृष्टीत छाप पाडली होती. त्यामुळे त्यांच्या आकस्मिक निधनानं अनेकांना धक्का बसला आहे. पण आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक अजरामर सिनेमे केले. पाहा त्यांचे गाजलेले 10 सिनेमे. 1. अर्धसत्य: 1983 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमानाती भूमिकेसाठी ओम पुरी यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. एक इमानदार पोलिसाची भूमिका त्यांनी साकारली होती. या सिनेमात ओम पुरी यांच्यासह स्मिता पाटीलही होती. 2. जाने भी दो यारो: अनेकदा गंभीर भूमिका साकारणारे ओम पुरी यांनी 'जाने भी दो यारो' या सिनेमातून विनोदी भूमिका साकारली होती. या सिनेमात त्यांनी भ्रष्ट बिल्डरची भूमिका निभावली होती. 3. मिर्च मसाला: पुन्हा एकदा स्मिता पाटील आणि नसरुद्दीन शाहा यांच्यासोबत ओम पुरी यांनी मिर्च मसाला या सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमाही बराच गाजला होता. 4. आक्रोश: नसीरुद्दीन शहा, स्मिता पाटील आणि ओम पुरी हे त्यावेळी अभिनयातील बादशहा मानले जायचे. 1980 साली आलेल्या आक्रोश सिनेमात ओम पुरी यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता. या सिनेमाला उत्कृष्ट सिनेमा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 5. आस्था: 1997 साली ओम पुरी आणि रेखा यांचा आस्था हा एक बराच बोल्ड सिनेमा आला होता. या सिनेमात ओम पुरीनं रेखाच्या पतीची भूमिका साकारली होती. 6. तमस: दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या तमस या सिनेमात नाथू ही भूमिका ओम पुरी यांनी साकारली होती. 7. चाची 420: चाची 420 हा सिनेमा भलेही कमल हासन यांच्या अभिनयासाठी ओळखला जात असला तरीही या सिनेमातील असलेल्या छोट्याशा भूमिकेतही ओम पुरी यांनी प्राण ओतले होते. या सिनेमातील त्यांची सेक्रेटरीची भूमिका प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहणारी आहे. 8. माचिस: गुलजार दिग्दर्शित माचिस सिनेमात ओम पुरी यांनी सनातन नावाची भूमिका केली होती. जो खलिस्तानची मागणी करणारा दहशतवादी संघटनेतील होता. 9. ईस्ट इज ईस्ट: बॉलिवूडच नाही तर ओम पुरी यांनी हॉलिवूड सिनेमातही काम केलं आहे. त्यातीलच एक सिनेमा ईस्ट इज ईस्ट यामध्ये त्यांनी जाहिद जॉर्ज खान ही प्रमुख भूमिका साकारली होती. याच सिनेमाचा वेस्ट इज वेस्ट हा सिक्वेलही आला होता. त्यातही ओमपुरी यांनी उत्कृष्ट अभिनय केला होता. 10. माय सन दी फनॅटिक: 1997मध्ये ब्रिटिश ड्रामा आधारित सिनेमा सन द फनॅटिक ही एका टॅक्सी ड्रायव्हरची कथा आहे. ज्याचा जन्म पाकिस्तानमध्ये झाला आहे. तरीही तो धर्मनिरपेक्ष आहे. पण जेव्हा त्याचा मुलगा कट्टर इस्लामकडे वळतो तेव्हा त्याच्या आयुष्यात काय बदल होतो हेच या सिनेमात दाखवण्यात आहे. या सिनेमात ओम पुरी यांनी परवेजची भूमिका साकारली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amitabh Bachchan on Hairs And Height: 'कोणतीही अभिनेत्री काम करणार नाही...'; अमिताभ बच्चन यांची उंची पाहून घाबरायचे मेकर्स, केस वाढवण्यामागचं कारणही सांगितलं
'कोणतीही अभिनेत्री काम करणार नाही...'; अमिताभ बच्चन यांची उंची पाहून घाबरायचे मेकर्स, केस वाढवण्यामागचं कारणही सांगितलं
Bollywood Actor Inspiring Journey: बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी 'हा' अभिनेता स्पामध्ये करायचा काम; एकेकाळी अडखळत बोलायचा, नंतर 'बाहुबली'ला आवाज देत जिंकली प्रेक्षकांची मनं
बॉलिवूडमध्ये काम करण्यापूर्वी 'हा' अभिनेता स्पामध्ये करायचा काम; एकेकाळी अडखळत बोलायचा, नंतर 'बाहुबली'ला आवाज देत जिंकली प्रेक्षकांची मनं
Actress Mothers Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
Kangana Ranaut on Jaya Bachchan: 'नहीं बताऊंगी...'; जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईक ढकलला, कंगना रनौतने VIDEO शेअर करत लगावला टोला
'नहीं बताऊंगी...'; जया बच्चन यांनी आंदोलनात पत्रकाराचा माईक ढकलला, कंगना रनौतने VIDEO शेअर करत लगावला टोला

व्हिडीओ

Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO
Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
गोकुळच्या निवडणुकीत हसन मुश्रीफांच्या नाराजीवर मुख्यमंत्र्यांनी कोणता शब्द दिला? महायुतीच्या पॅनेलचे नेतृत्व कोण करणार?? इनसाईड स्टोरी समोर!
Rohit Pawar :
"तो भाजपच्या नेत्याचा कार्यकर्ता, त्या नेत्याचं अर्थकारण बघतो, पालिकेची कामं घेतो"; एमपीएससी आंदोलनाविरोधात कोर्टात गेलेल्या याचिकाकर्त्याची कुंडली रोहित पवारांनी काढली
Beed: बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
बीडकरांनो, पाणी जपून वापरा! वाण धरणात फक्त 18% साठा; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाचा मोठा निर्णय
RBI Repo Rate: गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
गृहकर्जधारकांना मोठा झटका, चार वर्षात जे घडलं नाही ते झालं, रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला
Rohit Pawar: काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
काल रोहित पवारांचा पुणे बंद पाडण्याचा इशारा, आज पहाटे अचानक एस.एम जोशी पुलावर पोलिसांच्या पिंजरा गाड्या पोहोचल्या, सोबत शेकडो पोलिसांचा प्रचंड फौजफाटा
Uday Samant On Vivekanand Patil MPSC Protest Pune: विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
विवेकानंद पाटलांच्या घरातील तो फोटो बघून मला आनंद; उदय सामंताकडून कौतुक, हमीही देऊन टाकली!
Nashik Crime News: नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
नाशिकमध्ये पोलिसाच्या पत्नीनं संपवलं जीवन, चारित्र्यावरती संशय, फ्लॅट दीराच्या नावावर करण्यासाठी दबाव अन् मारहाण, स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठलं पण पायरीवरतीच...
Mumbai Pune Missing Link Bike found: मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंट कंपनीच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंटच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
Embed widget