Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Abdu Rozik : अब्दुने केलेला साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट केला असल्याचे काहींनी म्हटले. मात्र, त्यावर अब्दुने भाष्य केले आहे.
Abdu Rozik : बिग बॉस 16 मध्ये झळकलेला ताजकिस्तानचा प्रसिद्ध गायक अब्दु रोझिकने (Abdu Rozik) आपल्या लग्नाची घोषणा केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी साखरपुडा केला. मात्र, अब्दुने केलेला साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट केला असल्याचे काहींनी म्हटले. मात्र, त्यावर अब्दुने नाराजी व्यक्त केली. एका कमी उंचीच्या व्यक्तीला आपलं प्रेम मिळाले आहे, हे काहींना बघवत नाही. त्यामुळे माझ्यावर आरोप होत असल्याचे त्याने म्हटले.
ताजिकिस्तानचा प्रसिद्ध गायक अब्दु रोझिकने गायलेली 'ओही दिली जोर', 'चकी चकी बोरॉन' आणि 'मोदर'ही गाणी प्रसिद्ध आहेत. मात्र, 'बिग बॉस 16'मध्ये आल्यानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. भारतात त्याचे फॅन फॉलोईंग खूप वाढले. यानंतर, तो सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटात झळकला होता. त्याशिवाय, 2023 मध्ये तो 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 13' मध्येही सहभागी झाला.
अब्दुने काही दिवसांपूर्वीच शारजाहच्या अमीरा नावाच्या मुलीसोबत साखरपुडा केला. त्याच्या काही दिवसांपूर्वी त्याने लग्नाची घोषणा केली होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांची होणारी वधू कोण, याची उत्सुकता निर्माण झाली होती.
अब्दु रोझिकने अमीरासोबत केलेला साखरपुडा हा एक पीआर स्टंट असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले. मात्र, हे सगळे दावे, आरोप अब्दुने फेटाळून लावले. ईटाइम्ससोबत बोलताना त्याने सांगितले की, मी माझ्या कोणत्याही म्युझिक व्हिडीयोचा पीआर नाही करत. माझ्यासारख्या लहान उंचीच्या व्यक्तीला प्रेम मिळालं आहे, हे काहींना बघवत नाही असेही अब्दुने म्हटले.
पीआर स्टंट नाही माझा साखरपुडा...
लहान वयात लग्न करण्याबाबत 20 वर्षीय सांगितले की, एका फूड जॉईंटवर अमीरासोबत भेट झाली. त्यावेळी एकाच नजरेत प्रेम झाले. आपली प्रेयसी खूपच समजूतदार आहे, असे त्याने सांगितले. त्याने पुढे म्हटले की, अमीरा खूपच सुंदर आहे. तिचे लांब केस आणि सुंदर डोळे आहेत. आम्ही दोघांना एकमेकांना चार महिन्यांपासून ओळखतो. ती एक बिझनेस एडमिनिस्ट्रेशनच्या विषयाची विद्यार्थीनी आहे. ती समजूतदार असून आमच्यात चांगली बाँडिंग आहे असेही अब्दुने म्हटले.
View this post on Instagram
अब्दुने म्हटले की, माझी उंची 115 सेमी आहे तर तिची उंची 155 सेमी आहे. या जगात अनेक असे लोक आहेत, दिव्यांग आहेत आणि त्यांना आपल्या जीवनाचा जोडीदार मिळतो. मी लहान असताना मला जीवनसाथी भेटणार की नाही, याची चिंता सतावत असे. पण, ईश्वराच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित झाले असल्याचे त्यांने सांगितले.