Aatmapamphlet Marathi Movie : "अंथरुणाच्या बाहेर पाय पसरता येत नाहीत"; ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या दिग्दर्शकाची पोस्ट; म्हणाला, "शेवटी मराठी सिनेमा आणि..."
आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या चित्रपटाचा दिग्दर्शक आशिष बेंडे (Ashish Bende) यानं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

Aatmapamphlet Marathi Movie: आत्मपॅम्फ्लेट (Aatmapamphlet) या मराठी चित्रपटाचं अनेकांनी कौतुक केलं. अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या चित्रपटाच्या कथानकाचं आणि या चित्रपटामधील कलाकारांचे कौतुक केले. पण आता आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाचा दिग्दर्शक आशिष बेंडे (Ashish Bende) यानं फेसबुकवर पोस्ट शेअर करुन एक खंत व्यक्त केली आहे. त्याच्या या पोस्टची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
आशिष बेंडेची पोस्ट
आशिष बेंडेनं पोस्टमध्ये लिहिलं, "विकडेजला भरघोस प्रतिसाद मिळू शकेल असे शोज मिळाले आहेत. असो, जोक्स अपार्ट, यात थिएटर्स किंवा प्रेक्षक यांचा कोणाचाच दोष नाही. अगदी 1000%. आम्हीच सगळे प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवायला कमी पडलो. शेवटी मराठी सिनेमा आणि त्याचं मार्केटिंग आणि पब्लिसिटीचं एक बजेट ठरलेलं असतं. त्या अंथरुणाच्या बाहेर पाय पसरता येत नाहीत. तर ज्या ज्या प्रेक्षकांना हा सिनेमा बघायची इच्छा असेल त्यांनी बुधवारच्या आत हा सिनेमा बघावा असं मी आवाहन करतो. कारण गुरुवार किंवा शुक्रवारी सिनेमा उतरेल असा माझा अंदाज आहे. त्यामुळे विकेंडपर्यंत थांबून मग बघुयात असा विचार करत असाल तर कदाचित भ्रमनिरास होऊ शकतो. बाकी ज्या ज्या प्रेक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे, प्रेम दिलं आहे त्यांचे मनःपूर्वक आभार. भावांनो!"
ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांनी आत्मपॅम्फलेट या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. सई ताम्हणकर, सुबोध भावे, ललित प्रभाकर या मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आत्मपॅम्फलेट या चित्रपटाचे कौतुक केलं आहे. या चित्रपटाचे लेखन परेश मोकाशीनं केलं आहे.
'आत्मपॅम्फ्लेट' चित्रपटाबाबत आशिष अविनाश बेंडे यानं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं, "ही फक्त लव्ह स्टोरी नाहीये. लव्ह स्टोरी हा फक्त खांदा आहे, या खांद्यावरुन आम्ही बऱ्याच गोळ्या चावल्या आहेत, असं म्हणता येईल. 90 चा काळ आम्हाला उभा करायचा होता. त्या काळातील नॉस्टॅलजिक गोष्टी तुम्हाला या चित्रपटात दिसतील."
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
