Aata Vel Zaali : सर्व सांगून टाकायची 'आता वेळ झाली'; दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी मुख्य भूमिकेत
Aata Vel Zaali : 'आता वेळ झाली' हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) आणि रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) मुख्य भूमिकेत आहेत.
Aata Vel Zaali : 'आता वेळ झाली' (Aata Vel Zaali) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) आणि रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi) मुख्य भूमिकेत आहेत. प्रतीक गांधी यांनी या सिनेमाची घोषणा केली आहे. इच्छामरण विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे.
अनंत महादेवन दिग्दर्शित, लिखित 'आता वेळ झाली' या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. या पोस्टरमध्ये दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी दिसत आहेत. या सिनेमाची घोषणा अभिनेते प्रतीक गांधी यांनी आपल्या सोशल मीडियावरुन केली आहे.
इच्छामरण विषयावर करणार भाष्य
सत्य घटनेवर आधारित 'आता वेळ झाली' या चित्रपटाच्या नावातच अवर ग्लास दिसतोय आणि त्यातून सरत चाललेली वेळही दिसतेय. ‘इफ यू वाँट अ हॅप्पी एण्डिंग, यू मस्ट नो व्हेअर टू एण्ड युअर स्टोरी’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. या ओळीचा या चित्रपटाशी नेमका काय संबंध आहे, याचे उत्तर प्रेक्षकांना 23 फेब्रुवारी रोजी सिनेमा आल्यावरच मिळणार आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'आता वेळ झाली'
दिलीप प्रभावळकर, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह 'आता वेळ झाली' या चित्रपटात भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर, अभिनव पाटेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनंत महादेवन यांनी या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
View this post on Instagram
'आता वेळ झाली' या सिनेमाबद्दल बोलताना अनंत महादेवन म्हणाले,"जीवनाचा शेवट आनंदी व्हावा, असे वाटणाऱ्या प्रत्येक वयस्काच्या अस्तित्वाची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे हृषिकेश मुखर्जींच्या ‘आनंद’ची दुसरी बाजू आहे. इच्छामरण हा एक असा विषय आहे, ज्याने या महामारीच्या काळात मला प्रभावित केले".
अनंत महादेवन पुढे म्हणाले,"जेव्हा जगाने जीवन आणि मृत्यूकडे एका वेगळ्या नजरेने पाहाण्यास सुरूवात केली. तरुणाईचाही जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला. भौतिकवादी दृष्टीकोनापेक्षा व्यावहारिक दृष्टीकोनाकडे त्यांचा कल वाढला. हा चित्रपट पाहून वृद्धांच्या मनातील घालमेल तरूणाईला नक्कीच कळेल".
रिलीजआधीपासून चर्चेत असलेला 'आता वेळ झाली'
डेल्लास आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट अभिनेता), राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक) आणि लोकप्रिय जागरण चित्रपट महोत्सव, शारजाह फिल्म प्लॅटफॅार्म इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये ज्युरी अवॅार्ड यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवांसाठी ‘आता वेल झाली’ची यापूर्वीच निवड झाली आहे. त्यामुळे रिलीजआधीपासून हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे.
संबंधित बातम्या