Happy Birthday Rahul Roy : सलमान-शाहरुखपेक्षा भारी स्टारडम, 11 दिवसांत 47 चित्रपट साईन; 'या' चुकीमुळे करियर उद्ध्वस्त
Rahul Roy Birthday : 90 दशकात या अभिनेत्याची भयंकर क्रेझ होती. याने 11 दिवसांत 47 चित्रपट साईन केले होते. त्याकाळीचा या सुपरस्टार अभिनेत्याबद्दल जाणून घ्या.

Rahul Roy Birthday Special : बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक अभिनेते आले आणि गेले. यामध्ये काही अभिनेत्यांना रातोरात प्रसिद्धी मिळाली, काहींनी मेहनतीच्या बळावर काम मिळवलं, तर काहींचं नशीब खास चाललं नाही. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक सुपरस्टार झाले. यातीलच एका सुपरस्टारबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्याच्या स्टारडमने शाहरुख-सलमानलाही टक्कर दिली होती. 90 च्या दशकात या अभिनेत्याचा बोलबाला होता. पहिल्याच चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्याला साईन करण्यासाठी निर्मात्यांची रांग लागायची. या अभिनेत्याने अवघ्या 11 दिवसांत 47 चित्रपट साईन करण्याचा विक्रम केला होता. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला या अभिनेत्याची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. पण, त्यानंतर याच्या नशिबाने कलाटणी घेतली आणि तो इंडस्ट्रीपासून दूर गेला.
स्टारडममध्ये शाहरुख-सलमानला टक्कर
शाहरुख, सलमान आणि आमिर खान यांच्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये येऊनही हा अभिनेता रातोरात शिखरावर पोहोचला. तरुणी या अभिनेत्यावर जीव ओवाळून टाकायच्या. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. हा अभिनेता म्हणजे राहुल रॉय. 1990 मध्ये आलेल्या आशिकी चित्रपटामुळे अभिनेता राहुल रॉय रातोरात स्टार बनला. अभिनेता राहुल रॉय आणि अभिनेत्री अनु अग्रवाल यांची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. रातोरात राहुल रॉय हे नाव प्रत्येक घराघरात पोहोचलं. यानंतर 'प्यार का साया' आणि 'जुनून' हे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. अवघ्या 26 वर्षांचा राहुल रॉय तेव्हा शाहरुख, सलमान आणि आमिरपेक्षाही मोठा स्टार बनला होता.
11 दिवसांत 47 चित्रपट केले साईन
90 च्या दशकाच्या मध्यात राहुल रॉयची नशीबाने साथ सोडली. त्याने अनेक चित्रपटांची ऑफर नाकारली. राहुलने यश चोपडा यांचा डर चित्रपट नाकारला, याचं चित्रपटामुळे पुढे शाहरुख खानला स्टारडम मिळाला. 1992 मध्ये आलेल्या जुनून चित्रपटानंतर राहुलचे 15 चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. त्यांचा शेवटचा चित्रपट 'अफसाना दिलवालों' 2001 मध्ये प्रदर्शित झाला होता, त्यानंतर त्यांनी काही वर्षांसाठी ब्रेक घेतला आणि 2006 मध्ये परतला.
'या' चुकीमुळे करियर उद्ध्वस्त
'आशिकी', 'प्यार का साया' आणि 'जुनून' या व्यतिरिक्त राहुलचा कोणताच चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. या दरम्यान, राहुलने काही चांगल्या चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या, ज्या ऑफर स्वीकारुन इतर अभिनेते सुपरस्टार बनले, यामधीलच एक चित्रपट म्हणजे 'डर'. या चित्रपटाव्यतिरिक्तही राहुलने अनेक चित्रपट नाकारले, जे नंतर सुपरहिट ठरले. एकामागोमाग एक फ्लॉप चित्रपट दिल्याने नंतर त्याला काम मिळणं बंद झालं. त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. राहुल बिग बॉस शोमध्ये झळकला आणि पहिल्या सीझनचा विजेताही ठरला, पण त्याचा स्टारडम त्याला परत मिळवता आला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
एका परफेक्ट KISS सीनसाठी 37 रिटेक, अभिनेत्रीचीही हालत खराब; अभिनेत्याने सांगितला किस्सा























