![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aamir Khan : आमिर खान अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात नतमस्तक; 'लाल सिंह चड्ढा' च्या टीमसोबत केली प्रार्थना
लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटामध्ये आमिरसोबतच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि मोना सिंह (Mona Singh) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
![Aamir Khan : आमिर खान अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात नतमस्तक; 'लाल सिंह चड्ढा' च्या टीमसोबत केली प्रार्थना aamir khan visits golden temple day before release of movie laal singh chaddha Aamir Khan : आमिर खान अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात नतमस्तक; 'लाल सिंह चड्ढा' च्या टीमसोबत केली प्रार्थना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/10/c58c7a843effde22ce7959e0f74ce6f21660113372663259_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aamir Khan : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा सध्या त्याच्या लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आमिरचा हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये आमिरसोबतच अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि मोना सिंह (Mona Singh) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. नुकतीच आमिरनं अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली आहे. यावेळी आमिरसोबत मोना सिंह देखील होती.
लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वी आमिरनं मोना सिंह आणि चित्रपटाच्या टीमसोबत अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली. आमिरनं प्रर्थना देखील केली. यावेळी आमिर व्हाईट टी-शर्ट आणि ब्लॅक पँट अशा कॅज्युअल लूकमध्ये दिसला तर अभिनेत्री मोना सिंह ही पिंक कलरच्या ट्रेडिशनल आऊटफिटमध्ये दिसली. याआधी देखील आमिरनं सुवर्ण मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी तो लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे शूटिंग करत होता. शूटिंगमधून थोडा वेळ ब्रेक घेऊन त्यानं सुवर्ण मंदिरामध्ये दर्शनासाठी गेला होता.
पाहा व्हिडीओ:
बऱ्याच दिवसांपासून आमिरनं मोठ्या पडद्यावरुन ब्रेक घेतला होता. आता तो लाल सिंह चड्ढा चित्रपटामधून कम-बॅक करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट फॉरेस्ट गंप या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक असणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. आमिर खान प्रोडक्शन्स, किरण राव, वायकॉम 18 स्टडियोज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सोशल मीडियावर काही लोक या चित्रपटाचा विरोध करत आहेत तर काही या चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक करत आहे.
लाल सिंह चड्ढा आणि रक्षा बंधन चित्रपाटची बॉक्स ऑफिसवर होणार टक्कर
आमिरच्या लाल सिंह चड्ढा आणि अक्षय कुमारच्या रक्षा बंधन या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. कोणत्या चित्रपटाला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळेल? या प्रश्नाचं उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळेल.
वाचा इतर बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)