एक्स्प्लोर

आमिर खानच्या 'या' चित्रपटाचं तीन वेळा बदललं नाव, चौथ्यांदा झालं फायनल, 50 कोटींचं बजेट असलेल्या चित्रपटानं केली तिप्पट कमाई

Bollywood Movie : या चित्रपटासाठी सैफ अली खान (Saif Ali Khan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) यांना अप्रोच करण्यात आलं होतं. मात्र, या सर्वांनी स्पष्ट नकार दिला.

Bollywood Movie : आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर (Kareena Kapoor) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे तलाश (Talaash). या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर आणि राणी मुखर्जी (Rani Mukharjee) मुख्य भूमिकेत दिसल्या होत्या. आमिर खाननं या चित्रपटासाठी स्विमिंग शिकलं होतं. ते शिकण्यासाठी त्याला तब्बल चार महिले लागले होते. या चित्रपटासाठी सैफ अली खान (Saif Ali Khan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) यांना अप्रोच करण्यात आलं होतं. मात्र, या सर्वांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर या चित्रपटासाठी आमीर खानची निवड करण्यात आली. पण, ते म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न, असाच काहीसा प्रकार या चित्रपटाच्या बाबतीत पाहायला मिळाला. या चित्रपटाला नावंच मिळत नव्हतं. सुरुवातीला काहीतरी वेगळं नाव देण्याचं ठरवण्यात आलं. त्यानंतर पुन्हा ते नाव बदलण्यात आलं. 

चित्रपटाचं नाव तब्बल तिनदा बदललं

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आमिर खानच्या या चित्रपटाचं नाव तब्बल तिनदा बदलण्यात आलं होतं. आधी धवन, मग अॅक्ट ऑफ मर्डर आणि नंतर जख्मी अशी नावं या चित्रपटाला देण्यात आली होती. पण, त्यानंतर नावं बदलून तलाश नाव देण्यात आलं. 

बॉक्स ऑफिसवर छप्पडफाड कमाई

तलाशच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं तर हा चित्रपट 50 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचं झालं, तर त्याचे जगभरात 175 कोटींचं कलेक्शन होतं. हा थ्रिलर चित्रपट सर्वांना खूप आवडला. या चित्रपटाला समीक्षकांकडूनही चांगला प्रतिसादही मिळाला.

आमिर खानसोबत करीना कपूर खान, जोडीची विशेष चर्चा 

रिपोर्ट्सनुसार, प्रोडक्शन दरम्यान एक अफवा पसरली होती की, चित्रपटाचा शेवट कहानी (2012) सारखाच आहे आणि त्यामुळे त्याचं पुन्हा शूटिंग करावं लागेल. मात्र ही केवळ अफवा असल्याचं चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सिद्ध झालं. तलाश व्यतिरिक्त आमिर खान आणि करीना कपूर यांनीही एकत्र काम केलं. या दोघांनी थ्री इडियट्स आणि लाल सिंह चड्ढा मध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली होती. दोन्ही चित्रपटांमध्ये आमिर आणि करिनाची केमिस्ट्री सर्वांनाच आवडली होती.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actor Life Story : चार वर्षांत 50 चित्रपट, दोन हिट अन् 48 फ्लॉप, तरीही चाहते जीव ओवाळून टाकण्यास असतात तयार, ओळखलं का कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ravichandran Ashwin Announces Retirement :   रविचंद्रन अश्विन निवृत्तीची घोषणा करताना झाला भावुकSpecial Report on Mumbai Boat Accident : दुर्घटनेची लाट, मृत्यूचं तांडव, पर्यटकांवर काळाचा घालाSpecial Report on Beed Crime : बीड हत्येचं प्रकरण, कोण आहेत वाल्मीक कराड?Zero hour on Today Match : अश्विन भारताचा यशस्वी गोलंदाज, सहा कसोटी शतकांसह 3503 धावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
Embed widget