एक्स्प्लोर
'दंगल गर्ल' झायरा आणि आमीरच्या 'सिक्रेट सुपरस्टार'चा ट्रेलर लाँच
14 वर्षांच्या इन्सियाला पार्श्वगायिका होऊन जगभरात नाव कमवण्याची इच्छा आहे. इन्सियाच्या आईचा तिला छुपा पाठिंबा आहे, मात्र वडिलांचा ठाम विरोध आहे.
मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान आणि 'दंगल गर्ल' झायरा वसिम यांची मुख्य भूमिका असलेल्या 'सिक्रेट सुपरस्टार' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. आमीर खानने ट्विटरवरुन हा ट्रेलर रिलीज केला आहे.
14 वर्षांच्या इन्सियाला पार्श्वगायिका होऊन जगभरात नाव कमवण्याची इच्छा आहे. इन्सियाच्या आईचा तिला छुपा पाठिंबा आहे, मात्र वडिलांचा ठाम विरोध आहे. 2 मिनिटं 45 सेकंदांच्या या ट्रेलरमध्ये तिचा हा प्रवास उलगडताना दिसतो.
वडिलांच्या विरोधानंतरही इन्सिया बुरखा घालून गाणं गाते आणि यूट्युबवर व्हिडिओ शेअर करते. त्यामुळे सोशल मीडियावर तिला प्रसिद्धी मिळते. यापुढे काय होतं, हे चित्रपटात पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
अद्वैत चंदन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आमीर खान, किरण राव यांची निर्मिती असलेला हा सिनेमा
दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच 19 ऑक्टोबर 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे.
पाहा ट्रेलर :
https://twitter.com/aamir_khan/status/892732155679223808
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement