एक्स्प्लोर
आमीर आणि अमिताभ मोठ्या पडद्यावर एकत्र येणार

मुंबई: बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान हे दोघेही बॉलिवूडचे दिग्गज कलाकार मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. यशराज फिल्म्स बॅनर खाली तयार होणारा 'ठग्स ऑफ हिंदोस्ता'मध्ये हे दोघेही प्रमुख भूमिका साकारणार असून हा चित्रपट 2018च्या दिवाळीमध्ये रिलीज होणार आहे.
या चित्रपटाच्या निमित्ताने धूम-3चा लेखक आणि दिग्दर्शक विजय कृष्णा आचार्य (विक्टर) पुन्हा एकदा आमीरसोबत काम करत आहे.
आमीरने आपल्या फेसबूक पेजवरून ही माहिती दिली असून त्याने या पोस्टमध्ये, ''शेवटी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची माझी इच्छा आता पूर्ण होत आहे. धन्यवाद आदित्य चोप्रा, विक्टर, ठग्स ऑफ हिंदोस्तासाठी. माझ्या जीवनात मी ज्यांना सदैव आदर्श मानले, त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सूक आहे.''
''या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षीपासून सुरु होत असून हा चित्रपट 2018च्या दिवाळीपर्यंत रिलीज होणार आहे.'' असेही आमीर यावेळी म्हणाला. या चित्रपटाच्या आभिनेत्रीच्या नावाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















