एक्स्प्लोर

महाराष्ट्रासह जगाला वेड लावणाऱ्या ‘सोनू’चा निर्माता सोलापूरचा पठ्ठ्या

‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय...’ या गाण्याने सध्या धुमाकूळ घातला आहे. खरं तर हे गाणं खुप वर्षांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्वरुपात गायलं जातं आहे. मात्र सध्या जे गाणं लोकप्रिय झालंय, ते सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी गावातील अजय क्षीरसागर आणि त्यांची पत्नी भाग्यशाली क्षीरसागर यांनी बनवलंय.

पुणे/सोलापूर : ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय...’ या गाण्याने सध्या धुमाकूळ घातला आहे. खरं तर हे गाणं खुप वर्षांपासून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या स्वरुपात गायलं जातं आहे. मात्र सध्या जे गाणं लोकप्रिय झालंय, ते सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी गावातील अजय क्षीरसागर आणि त्यांची पत्नी भाग्यशाली क्षीरसागर यांनी बनवलंय. सध्या प्रत्येकाच्या मोबाईल, चौकाचौकात, एवढंच काय महाराष्ट्राच्या विधानसभेत देखील ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय’ हा प्रश्न गाण्यातून विचारला जातो आहे. या गाण्याच्या माध्यमातून विचारला जाणाऱ्या प्रश्नामुळे मुंबईतील खड्डयांचा प्रश्न यावर्षी पुन्हा चव्हाट्यावर आला आणि त्यावरुन मोठं राजकारणही झालं. मात्र, जानेवारी महिन्यात अजय क्षीरसागर यांनी हे गाणं बनवलं, तेव्हा या गाण्यावरुन एवढ महाभारत होईल याची कल्पनाही त्यांना नव्हती. 'सोनू' गाण्याचा जन्म.... ‘सोनू’च्या गाण्याचा जन्म आठ महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीतील अण्णाभाऊ साठे नगरातील छोट्याशा घरात झाला. आपल्या भावाला वेगळे काहीतरी गाणे देण्यासाठी अजय क्षीरसागर हे प्रयत्नात होते आणि त्याचवेळी त्यांच्या पत्नीने लाडाने ‘सोनू बाजारात चला’ असे अजयला म्हणाली. त्यावरुनच अजय यांनी गाणं लिहायला सुरुवात केली आणि ‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय काय’ हे लोकगीत जन्माला आले. ...आणि 'सोनू' व्हायरल झालं! व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर या गाण्याला मिळणारा प्रतिसाद पाहून अजय क्षीरसागर यांनी हे गाणं पत्नीसोबत रेकॉर्ड करायचं ठरवलं. पुण्याजवळील आळंदीमध्ये त्यांनी हे गाणं रेकॉर्ड करुन ते भावाला पाठवलं. अजय यांचा भाऊ अविनाश अवघडेने हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट केलं आणि त्याच गाण्यावर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर येऊ लागल्यावर त्यांना आपल्या गाण्यातील जादू समजली. या गाण्याची लोकप्रियता फक्त मराठी किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नाही. हिंदी आणि इतर भाषांमध्येही हे गाणं त्या त्या भाषेतील शब्दांसह तयार करण्यात आलं. सोलापूरच्या मातीतला हिरा सोलापूर जिल्ह्याला लोकसंगीताचा मोठा वारसा आहे. शाहीर अमर शेख यांच्या पासून प्रल्हाद शिंदे यांच्यापर्यंत आणि असे कितीतरी लोकप्रिय लोकसंगीतातील कलावंत या मातीने महाराष्ट्राला दिले. अजय क्षीरसागर यांच्या रुपाने नवोदित कलावंत सध्या कुर्डूवाडी येथून उदयास येऊ लागला आहे. घरातच लोकगीतांची परंपरा कुर्डूवाडी शहरातील अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीमधील छोट्याशा घरात अजय यांचं कुटुंबं राहतं. आजोबा नामदेव भिसे यांच्यासोबत अभ्यासाच्या पुस्तकांऐवजी लोकगीतांचा सराव करण्यात अजय मग्न राहायचा. आजोबा एकतारीवर सुरेख भजने म्हणायचे. त्यांच्या तालमीत अजयचा गळा तयार झाला. लिहिण्याचीही आवड असलेल्या अजयने देवीची गाणी लिहून म्हणायला सुरुवात केली. त्याच्या आवाजाची छाप चंदन कांबळे या संगीतकाराला भुरळ पडून गेली आणि त्यांनी त्याला आपल्या सोबत घेतले. त्यांच्यासोबत अजय विविध कार्यक्रमातून लोकगीते सादर करू लागले. आता त्यांना व्यावसायिक ऑफर मिळू लागल्या असून ‘सोनू’ गाण्याला जन्म देऊनही त्याचे नाव फारसे कोणाला माहित नाही हे विशेष .

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Funeral Pravin Tarde Reaction: छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
छोटा नट गेला तरी बॉलिवूडवाले पांढरे कपडे घालून पुढे असतात, मग नानांच्या अंत्यसंस्काराला का नव्हते? प्रवीण तरडे संतापले
Nana Patekar Death Cause Revealed: नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
नाना पाटेकरांच्या मृत्यूबाबत संशयाचं धुकं, अनैसर्गिक मृत्यूची चर्चा, अखेर पोस्टमार्टेम रिपोर्ट समोर आला, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं?
Nana Patekar Nephew Anirudh Patekar: 'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
'काही तरी नक्कीच घडलं असेल…', नाना पाटेकरांच्या अकाली निधनावर पुतण्याला संशय, फिटनेस रुटीनबाबत सांगताना थेटच म्हणाला...
Nana Patekar Last Rites Makarand Anaspure Emotional Video Viral: सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO
सच्चा दोस्त, आधारस्तंभ हरपला; नाना पाटेकरांच्या जाण्यानं मकरंद अनासपुरे पुरते कोलमडले, डोळ्यांच्या कडा पाणावरा 'तो' क्षण, VIDEO

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget