एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'ऑस्कर' अध्यक्षांच्या हस्ते राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, 'भोंगा' सर्वोत्कृष्ट
56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ संकलक वामन भोसले, अभिनेते परेश रावल यांना राज कपूर तर अभिनेत्री सुषमा शिरोमणी, अभिनेते भरत जाधव यांना चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मुंबई : 56 व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्काराचा दिमाखदार सोहळा ऑस्कर अकादमीचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पार पडला. पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ऑस्कर अकादमीमार्फत जागतिक सिनेमाचं संग्रहालय तयार करण्यात येणार आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा पुतळा म्युझियममध्ये उभारण्यासाठी राज्य सरकार आग्रही असल्याचं सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. 'भोंगा' हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला, तर के. के. मेनन आणि मुक्ता बर्वे यांनी सर्वोत्तम अभिनयासाठी पुरस्कार पटकावले.
वरळीतील 'नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया' मध्ये राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या सोहळ्याला मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवर मंडळींनी हजेरी लावली होती. संकलक वामन भोसले, अभिनेते परेश रावल यांना राज कपूर तर अभिनेत्री सुषमा शिरोमणी, अभिनेते भरत जाधव यांना चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस अँड सायन्सेसचे (ऑस्कर ॲवॉर्डस) कार्यालय मुंबईत स्थापन करण्याबाबत आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारमार्फत करण्यात येईल. भारतात सध्या सर्वाधिक सिनेमांची निर्मिती केली जाते. 'बॉलिवूड नगरी' असलेल्या भारतात बेली पहिल्यांदा येत असताना अत्यंत आनंद होत आहे. ऑस्कर ॲकॅडमीचे सध्या लंडन आणि युरोप येथे कार्यालय आहेत. मात्र मुंबईत कार्यालय सुरु केल्यास याकडे आशियातले केंद्र म्हणून पाहता येईल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
वामन भोसले यांना 2019 च्या राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 5 लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच ज्येष्ठ अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 3 लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जॉन बेली, विनोद तावडे, संकलक कॅरॉल लिटलटन, गेल्या वर्षीचे पुरस्कार विजेत्यांच्या हस्ते या वर्षीचे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले.
पुरस्कार
सर्वोत्कृष्ट कथा - सुधाकर रेडी (नाळ)
सर्वोत्कृष्ट पटकथा - शिवाजी लोटन पाटील आणि निशांत धापसे ( भोंगा )
सर्वोत्कृष्ट संवाद - विवेक बेळे (आपला माणूस)
सर्वोत्कृष्ट गीत - संजय पाटील (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट संगीत - राजेश सरकाटे ( मेनका उर्वशी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत- विजय गवंडे (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - ऋषिकेश रानडे ( व्हॉट्सअप लग्न)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - प्रियंका बर्वे (बंदिशाळा)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक - उमेश जाधव ( मेनका उर्वशी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - स्वानंद किरकिरे ( चुंबक )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - छाया कदम ( न्यूड )
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता- फिरोज शेख (तेंडल्या)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री - गौरी कोठवदे (पुष्पक विमान)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट निर्मिती - शांताई मोशन पिक्चर्स ( बंदीशाला)
सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण चित्रपट दिग्दर्शन -सचिन जाधव आणि नचिकेत वाईकर ( तेंडल्या)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - के.के. मेनन ( एक सांगायचंय... अनसेड हार्मनी )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - मुक्ता बर्वे (बंदिशाळा )
सर्वोत्कृष्ट चित्रपट - भोंगा
यावर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून तिसऱ्या क्रमांकावर तेंडल्या, दुसऱ्या क्रमांकावर बंदिशाळा आणि पहिल्या क्रमांकावर भोंगा चित्रपट ठरले. एक सांगायचंय - अनसेड हार्मनी हा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट आणि भोंगा सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट ठरले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement