एक्स्प्लोर

माही गिलच्या वेब सीरिजच्या सेटवर टीम आणि क्रू मेंबर्सवर हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक

ठाणे येथील घोडबंदर परिसरात 'फिक्सर' या माही गिल स्टारर वेब सिरीजचे चित्रीकरण सुरु होते. शुटींगदरम्यान सेटवर राडा करणाऱ्या, वेबसिरीजमधील टीम आणि क्रू मेंबर्सना मारहाण करणाऱ्या चार जणांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई : ठाणे येथील घोडबंदर परिसरात 'फिक्सर' या माही गिल स्टारर वेब सिरीजचे चित्रीकरण सुरु होते. शुटींगदरम्यान सेटवर राडा करणाऱ्या, वेबसिरीजमधील टीम आणि क्रू मेंबर्सना मारहाण करणाऱ्या चार जणांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा सोनार (34), सोनू विरेंद्र दास (24) आणि सुरज शर्मा (29) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. सेटवर राडा करणारे, क्रू मेंबरला मारहाण करणारे गुंड नसून तेदेखील चित्रपट/मालिका इंड्स्ट्रीचा भाग आहेत, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. दोन लोकेशन मॅनेजरमधील वादामुळे हा राडा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सेटवरील कलाकारांना मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, दंगल करणे या कलमांखाली तीन जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिघांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान रोहित गुप्ता नावाचा त्यांचा चौथा साथीदार फरार आहे. 'फिक्सर' या वेब सिरीजच्या शुटींगसाठी घोडबंदर येथील लोकेशन ठरवण्यात आले होते. परंतु त्याचे काम आधी आपल्याला मिळाले होते, असा दावा आरोपींनी केला आहे. दरम्यान घोडबंदर परिसरातील एका शिपयार्डमध्ये 'फिक्सर'च्या क्लायमॅक्सचं शूटिंग सुरु होते, त्यावेळी चार गुंडांनी तिथे हैदोस घातला आणि मारहाण केल्याचे माहीने सांगितले होते. चित्रिकरणाची परवानगी नसल्याचे सांगत त्यांनी समोर येईल त्याला रॉड आणि दंडुक्यांनी मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. सेटवरील कॅमेऱ्यांसह महागड्या सामानाची तोडफोड केल्याचेही टीमचे म्हणणे आहे. फिक्सर वेबसिरीजच्या शूटिंगदरम्यान कलाकारांना रॉडने मारहाण, काही कलाकार जखमी | वसई | ABP Majha  अल्ट बालाजीची निर्मिती असलेल्या या वेब सीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा 'काल' चित्रपटाचे दिग्दर्शक सोहम शाह यांच्यावर आहे. हल्ल्यात शाह यांच्यासह छायाचित्रकार संतोष थुडियाल जखमी झाले. संतोष यांच्या डोक्याला जखम झाल्यामुळे सहा टाके पडले आहेत. सेटवर गुंडांनी राडा घातला, त्यावेळी वेब सीरिजमध्ये भूमिका करणारे दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया, अभिनेता शब्बीर अहलुवालियाही उपस्थित होते.  वेबसिरीजच्या शूटिंगदरम्यान कलाकारांवर हल्ला, कलाकारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट | मुंबई | ABP Majha  दरम्यान, काही गुंड माझ्या दिशेनेही मारहाण करण्यासाठी आले होत, परंतु महिलांना हात लावू नका, असं कोणीतरी म्हणाल्यामुळे ते मागे फिरले, असं माहीने सांगितलं. आमच्या वॅनिटी वॅनची तोडफोड झाल्यामुळे सेटवरील तंत्रज्ञांनी मला एका गाडीत सुरक्षित बसवलं, मात्र माझ्या ड्रायव्हरला जबरदस्त मारहाण करण्यात आली, असाही आरोप माहीने केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut on CJP: आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली
आमचं सरकार जनतेने निवडलंय, ते कसं चालवायचं हा आमचा अधिकार; कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर कंगना राणौत संतापली
Abhinav Shuklas Podcast: 'पॉxxx बघितल्याने ग्लोबल वार्मिंग वाढते', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा धक्कादायक दावा, नेमकं काय म्हणाला?
'पॉxxx बघितल्याने ग्लोबल वार्मिंग वाढते', प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या पतीचा धक्कादायक दावा, नेमकं काय म्हणाला?
Shreyas Talpade on Heart Attack: '10 मिनिटांसाठी मी मेलो होतो...', श्रेयस तळपदेला आला होता हृदयविकाराचा झटका, शुटिंगवेळी अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
'10 मिनिटांसाठी मी मेलो होतो...', श्रेयस तळपदेला आला होता हृदयविकाराचा झटका, शुटिंगवेळी अभिनेत्यासोबत नेमकं काय घडलं?
Atul Kulkarni Shares Video On Protest: कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...
कॉक्रोच पार्टीचा संसदेवर मोर्चा; मराठी अभिनेता अतुल कुलकर्णींचा VIDEO व्हायरल, थेट प्रश्न उपस्थित करत म्हणाले...

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Dharmendra Pradhan resignation: दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
दिल्लीत वेगवान हालचाली, धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला पोहोचले, केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा देणार?
Kalyan Crime News:
"फ्लॅटमध्ये बाथरूमचा नळ सुरूये, तिथे एक डेड बॉडी...'', व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली, दार उघडताच सगळेच चक्रावले
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
जंतरमंतरवरील आंदोलनाला 'समाजवादी' बळ! खासदार डिंपल यादवांचा खासदारांची फौज घेत संसदेतून थेट जंतरमंतरकडे मार्च; म्हणाल्या, 'देशातील तरुण लाठ्या खात आहेत..'
Delhi Parliament March CJP: सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
सीजेपी आंदोलकांचा तो गट संसदेपर्यंत धडकताच एकच धावाधाव, सुरक्षारक्षकांनी बंदुका रोखल्या, सगळे गेटकडे धावले
Ketan Agrawal Case: केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
केतनमध्ये नेमकं काय आवडलं?. सिया हसत म्हणाली 'He Is Caring and Kind'; साखरपुड्यात 'तो' भावनिक व्हिडिओ आला समोर
Samruddhi Mahamarg Accident : इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी संपूर्ण परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, घरी परतताना अपघात, आई वडिलांसह दुसऱ्या मुलीचा होरपळून मृत्यू, पाच जणांचा दुर्दैवी अंत
Delhi Jantar Mantar protest: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Video: जंतर मंतरवर जमलेल्या आंदोलक तरुणांवर दिल्ली पोलिसांकडून लाठ्या चालवण्यास सुरुवात
Embed widget