एक्स्प्लोर
Advertisement
सलमानशी लग्न करण्यासाठी तरुणी उत्तराखंडहून पळून मुंबईत
आपली मुलगी मानसिकदृष्ट्या अस्थिर असून तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती घरातून पळून आलेल्या 24 वर्षीय तरुणीच्या वडिलांनी दिली.
मुंबई : सुपरस्टार सलमान खानला भेटण्यासाठी देशभरातून चाहते 'गॅलक्सी' या त्याच्या निवासस्थानाबाहेर गर्दी करतात. सलमानशी लग्न करण्यासाठी उत्तराखंडमधील 24 वर्षीय मनोरुग्ण तरुणी घरातून पळाली आणि तिने मुंबई गाठली.
देहरादूनमध्ये राहणाऱ्या कुसुम नावाच्या तरुणीने 11 ऑगस्टला घर सोडलं. मजल दरमजल करत ती उत्तराखंडहून मुंबईला आली. मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या सलमानच्या घराबाहेर म्हणजेच गॅलक्सी अपार्टमेंटबाहेर येऊन ती धडकली.
सलमानच्या सुरक्षारक्षकांनी कुसुमला अडवलं. त्यानंतर तिच्याविषयी शिवडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत सलमानशी लग्न करण्यासाठी आपण घरातून पळून आल्याचं तिने सांगितलं.
पोलिसांनी कुसुमच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. आपली मुलगी मानसिकदृष्ट्या अस्थिर असून तिच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती तिच्या वडिलांनी दिली. यापूर्वीही अनेक वेळा ती घर सोडून गेल्याचं वडिलांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement