Nora Fatehi : 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणी नोरा फतेही न्यायालयात हजर; जबाब नोंदवला
Money Laundering Case : 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणी नोरा फतेहीने न्यायालयात तिचा जबाब नोंदवला आहे.
Nora Fatehi Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) गेल्या काही दिवसांपासून 200 कोटी मनी लॉंड्रिंग प्रकरणामुळे (Money Laundering Case) चर्चेत आहे. आता या प्रकरणी नवीन अपडेट समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नोराने या प्रकरणाबाबत न्यायालयात जबाब नोंदवला आहे. यासंदर्भात वकील वी.एस चौहान (VS Chauhan) यांनी माहिती दिली आहे.
नोरा फतेहीने 200 कोटींच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणी न्यायालयात जबाब नोंदवला आहे. आज नोराने स्वत: ईडी कार्यालयात हजर राहत जबाब नोंदवण्याची विनंती केली. त्यामुळे आता सुकेश चंद्रशेखरचं गुपित उघड होणार का असा प्रश्न पडला आहे.
Rs 200-cr money laundering case | Today my client appeared before Court&gave statement before magistrate to assist the investigation. Her conduct has been compliant since she has utmost faith in judicial process as well as laws of this country: VS Chauhan, Nora Fatehi's advocate
— ANI (@ANI) January 13, 2023
नेमकं प्रकरण काय?
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर सोबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव जोडले जात होते. त्यानंतर जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. पण आता याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले आहे.
सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर (bhumi Pednekar), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) सारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झालं आहे. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. काही अभिनेत्रींनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला तर काहींनी नाकारल्या होत्या.
View this post on Instagram
संबंधित बातम्या