Bollywood Wedding With Just 37 Guests Spend 77 Crore: बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटी कपलच्या लग्नाचा शाही थाट आगळा-वेगळाच; ज्यात पाहुणे फक्त 37, पण खर्च झाले 77 कोटी
Bollywood Wedding With Just 37 Guests Spend 77 Crore: ज्यांच्या विवाहसोहळ्याचा थाट-बाट काही और होताच, पण पाहुणे मात्र फक्त 37 होते. आणि झालेला खर्च थोडा थोडका नाही बरं का? तर तब्बल 80 कोटींच्या आसपास होता.

Bollywood Wedding With Just 37 Guests Spend 77 Crore: बॉलिवूडचं (Bollywood News) मोस्ट फेवरेट कपल (Most Favourite Couple) म्हटलं की, कुणीही अगदी धडाधड इंडस्ट्रीतल्या सेलिब्रिटी कपल्सच्या नावाचा पाढा वाचायला सुरू करेल. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या लग्नाचा थाट काही वेगळाच असतो. आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक जोडप्यांनी शाही अंदाजात आपली लग्नगाठ बांधली. यामध्ये रणवीर सिंह-दीपिका पदुकोण (Ranveer Singh-Deepika Padukone), अनुष्का शर्मा-विराट कोहली (Anushka Sharma-Virat Kohli), प्रियांका चोप्रा-निक जोनास (Priyanka Chopra-Nick Jonas), विकी कौशल-कतरिना कैफ (Vicky Kaushal-Katrina Kaif), आलिया भट्ट-रणबीर कपूर (Alia Bhatt-Ranbir Kapoor) आणि सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी (Sidharth Malhotra-Kiara Advani) यांसारख्या स्टार कलप्सचा समावेश होतो. बक्कळ पैसा खर्च करुन या सेलिब्रिटींनी आपला शाही विवाहसोहळा केला. पण, यांच्यापैकी एक कपल असं होतं, ज्यांच्या विवाहसोहळ्याचा थाट-बाट काही और होताच, पण पाहुणे मात्र फक्त 37 होते. आणि झालेला खर्च थोडा थोडका नाही बरं का? तर तब्बल 80 कोटींच्या आसपास होता.
सेलिब्रिटी कपलच्या शाही विवाहसोहळ्यासाठी आलेले फक्त 37 पाहुणे
आम्ही ज्या सेलिब्रिटी कपलबाबत बोलत आहोत, ते म्हणजे, बॉलिवूडचा बाजीराव रणवीर सिंह आणि मस्तानी दीपिका पादुकोणबाबत. दोघांनीही 2018 मध्ये आपली लग्नगाठ बांधली. आज ते बॉलिवूडच्या मोस्ट फेवरेट कपल्सच्या यादीत सर्वात अव्वल स्थानी आहेत. सर्व चाहते त्यांना लाडानं दीपवीर म्हणतात. दोघांच्या लग्नाच्या चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाहीतर संपूर्ण जगभरात झालेल्या.

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे, या हाय सिक्युरिटी असलेल्या लग्नात 77 कोटी रुपये खर्च झाले. आता खर्च ऐकून डोळे फिरले असतीलच, पण दीपवीरच्या लग्नाचा थाट काही औरच होता. आता या लग्नात आणखी एक आश्चर्यचकीत करणारी गोष्ट होती. आपल्याकडे लग्नसोहळा म्हणजे, पाहुण्यामंडळींची मांदियाळीच... पण दीपवीरच्या लग्नात याच्या अगदी उलट झालं. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या लग्नसोहळ्यासाठी फक्त आणि फक्त 37 पाहुणे उपस्थित होते.
दीपवीरचं लग्न 14 ते 15 नोव्हेंबर दरम्यान चाललं. या जोडप्यानं इटलीच्या लेक कोमो इथे लग्न केलं, जे एक अतिशय सुंदर शहर आहे. हा एक खाजगी समारंभ होता, म्हणून इथे विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रणवीर त्याची वरात सी-प्लेननं घेऊन डेस्टिनेशनवर पोहोचला होता.
रणवीर-दीपिकाची हटके लव्हस्टोरी
'गोलियों की रासलीला-रामलीला'च्या सेटवर रणवीर आणि दीपिका पहिल्यांदा भेटलेले. ही फिल्म 15 नोव्हेंबर 2013 रोजी रिलीज झालेली आणि कपलनं 15 नोव्हेंबरलाच लग्न केलेलं. ही फिल्म सुपरहिट झालेली आणि रणवीर सिंहचा समावेश बॉलिवूडच्या टॉप अॅक्टर्समध्ये झाला. यानंतर दीपवीर फिल्म बाजीराव मस्तानी आणि पद्मावतमध्ये एकत्र दिसले आणि ही फिल्म ब्लॉकबस्टर ठरली. रणवीर आणि दीपिका शेवटचे रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'मध्ये दिसले. दीपिकानं 8 सप्टेंबर 2024 रोजी एका चिमुकलीला जन्म दिला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























