Anannya Pandey on Sara Ali khan: 'सारा अली खान पहिल्यापासून फटकळ', अनन्या पांडेनं सांगितला शाळेतला किस्सा, म्हणाली, 'मी लपायचे तिच्यापासून..'
नुकत्याच एका मुलाखतीत अनन्या पांडे हिनं तिच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.
Anannya Pandey on Sara Ali khan: बॉलिवूडमधल्या मैत्रिणी म्हणून अनन्या पांडे आणि सारा अली खान ओळखल्या जातात.एकाच शाळेत असणाऱ्या या दोघींचं लहानपणी कसं नातं होतं? लहानपणापासूनच त्या मैत्रिणी होत्या का? याविषयी नुकत्याच एका मुलाखतीत अनन्या पांडे हिनं तिच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. सारा अली खान पहिल्यापासूनच फटकळ होती. त्यामुळं मी शाळेत असताना शक्यतो तिच्यापासून लपायचे असं म्हणत अनन्यानं एक मजेशीर किस्सा सांगितला.
सारा पहिल्यापासूनच फटकळ, मी शाळेत तिच्यापासून लपायचे
सारा पहिल्यापासूनच फटकळ आहे. ती कोणालाही काहीही बोलायची. आता ती जितकी बोलायला मोकळी वाटते. पण शाळेत ती जरा जास्त मोकळी होती. ती माझ्यापेक्षा दोन किंवा तीन वर्षांनी मोठी आहे. त्यामुळं मी तिच्यासमोर फार जायचेच नाही. मला आठवतं मी शाळेत असताना तिच्यापासून लपायचे. मी दुसऱ्या शिड्यांनी जायचे. ती पहिल्यापासूनच फटकळ आहे. मला वाटायचं ती मलाही काहीतरी बोलेल. त्यामुळे मी तिच्या समोर जायचेच नाही.
तिला माझं नावही माहित नव्हतं..
शाळेत असताना साराला माझं नावही माहित नव्हतं. आणि विशेष म्हणजे तिला माझं नाव जाणूनही घ्यायचं नव्हतं. आम्ही शाळेत असताना एक नाटक केलं होतं. ज्यात सारा प्रमुख भूमिकेत होती आणि मी तिची छत्री पकडणाऱ्या कोणाचातरी रोल करत होते. ती मला बोलवताना ए मुली.. इकडे ये.. असं बोलवायची. माझं नाव ए पासून सुरु होतं वगैरे म्हणून नाही. पण तिला माझं नावही माहिती नव्हतं. असं अनन्या म्हणाली.
आम्ही कामामुळे अधिक चांगल्या मैत्रिणी बनलो
आम्ही एकाच शाळेत असलो तरी आम्ही आमच्या कामामुळे अधिक चांगल्या मैत्रिणी झालो. मी चित्रपटात काम करण्याच्या वर्षभर आधी ती या क्षेत्रात आली. ती पहिल्यापासून खूप वेलकमिंग होती. ती नेहमी म्हणायची, 'चला जेवायला जाऊया' आणि तिने खरंच मैत्री करण्याचा प्रयत्न केला,” अनन्यानं सांगितलं.
हेही वाचा: