Star Heroine: तब्बल 40 वर्ष बॉलिवूडवर केलं राज्य; तरीही 'या' अभिनेत्रीने घालवलं एकटं आयुष्य, आजीने एका सुपरस्टारसोबतच्या लग्नाच्या प्लॅन फिस्कटवला, हिरोनं लग्न केलं पण...
Star Heroine: चित्रपटसृष्टीत अनेक प्रतिभावान अभिनेत्री झाल्या आहेत, पण एक अशी अभिनेत्री आहे जी एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गायिका देखील होती. तिचे देव आनंदसोबत प्रेमसंबंध होते. पण धर्माची भिंत त्याच्या मार्गात आली. तिला घरात कोंडून ठेवले. देव आनंदला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

Star Heroine: बॉलीवूडच्या या टॉप अभिनेत्री आणि पार्श्वगायिकेने 'अनमोल घडी', 'मिर्झा गालिब', 'फूल' आणि 'खूबसूरत' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तिने चार दशकांहून अधिक काळ अभिनेत्री आणि पार्श्वगायिका म्हणून इंडस्ट्रीवर राज्य केले. या बहु-प्रतिभावान अभिनेत्रीने स्वतःसाठी एक मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे परंतु तिलाही तिचे खरे प्रेम मिळू शकले नाही. या टॉप अभिनेत्री आणि गायिकेचे नाव सुरैया आहे. लाखो चाहते आणि लोकप्रियता असूनही, ती खऱ्या आयुष्यात पूर्णपणे एकटी होती. सुरैया आणि देव आनंद यांच्या अपूर्ण प्रेमाची कहाणी आजही सांगितली जाते.
सुरैया आणि देव आनंद यांची भेट 1948 मध्ये
असे म्हटले जाते की, सुरैया त्यांच्या दीर्घ चित्रपट कारकिर्दीत फक्त एकदाच प्रेमात पडल्या आणि ते प्रेम त्यांना मिळू शकलं नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य एकटे घालवण्याचा निर्णय घेतला. सुरैया आणि देव आनंद यांची भेट 1948 मध्ये आलेल्या 'विद्या' चित्रपटाच्या सेटवर झाली. 'विद्या'च्या शूटिंगदरम्यान देव आनंद आणि सुरैया यांचे प्रेम फुलले. ते एकमेकांसोबत बराच वेळ घालवू लागले. हळूहळू त्यांच्या जवळीकतेची बातमी सुरैयांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. सुरैया आणि देव आनंद यांच्यातील नात्याची माहिती मिळताच, सुरैयांचे कुटुंब संतापले. सुरैया यांना त्यांच्या कुटुंबाने घरातच नजरकैदेत ठेवले होते. या घटनेनंतर सुरैया देव आनंदला भेटू शकल्या नाहीत किंवा त्यांच्याशी बोलू शकल्या नाहीत. ते दोघे वेगवेगळ्या धर्माचे होते, त्यामुळे त्यांच्या आजीचा त्यांच्या लग्नाला कडाडून विरोध होता. देव आनंद यांनी त्यांच्या 'रोमान्सिंग विथ लाईफ' या आत्मचरित्रातही त्यांच्या आणि सुरैयांच्या नात्याचा उल्लेख केला आहे.
सुरैया यांनी स्वतःला भित्री असल्याचंही म्हटले होते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, देव आनंदने सुरैयासोबत पळून जाऊन त्यांच्याशी लग्न करण्याचा विचार केला होता, परंतु सुरैयांच्या आजीला हे कळले. जेव्हा सुरैयांच्या कुटुंबाने देव आनंद यांना जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून सुरैया यांनी माघार घेतली. त्यांनी देव आनंद यांचा लग्नाचा प्रस्ताव नाकारला आणि आयुष्यभर त्यांच्यापासून अंतर ठेवले. एका मुलाखतीत सुरैया यांनी प्रेमाबद्दल बोलताना, सुरैया यांनी स्वतःला भित्री असल्याचंही म्हटले होते. सुरैया यांनी म्हटले होते की, कुटुंबातील सदस्यांना तोंड देण्याची हिंमत त्याच्यांत नव्हती. सुरैयांसोबतच्या दुराव्या नंतर, देव आनंद पुढे गेले. त्यांनी सह-अभिनेत्री कल्पना कार्तिकशी लग्न केले. तर सुरैया यांनी अपूर्ण प्रेमाचे दुःख हृदयात दडवून ठेवले आणि संपूर्ण आयुष्य एकटे घालवले. सुरैया यांचे 2004 मध्ये वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले.























