एक हिंदू एक मुस्लीम, बॉलिवुडचे असे स्टार्स ज्यांनी धर्माचा विचार न करता आवडीच्या जोडीदाराशीच बांधली लगीनगाठ!
बॉलिवुडमध्ये अशा काही जोड्या आहेत, ज्यांनी धर्माचा विचार न करता प्रेमाला सर्वस्व मानलं. वेगवेगळे धर्म असूनही त्यांनी लग्नाचा निर्णय घेतलेला आहे.
मुंबई : प्रेमाला जात-धर्म नसतो असे म्हणतात. खरे प्रेमी धर्माच्या सीमा ओलांडून आवडीच्या जोडीदारासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतात. आपल्या आजूबाजूला तशी अनेक उदाहरणे आहेत. बॉलिवुडच्या दुनियेत तर तुम्हाला ही उदाहरणं खूप सारी मिळतील. सिनेसृष्टीत अशा अनेक जोड्या आहेत, ज्यामधील एक जोडीदार हिंदू तर एक जोडीदार मुस्लीम धर्मीय आहे. धर्म वेगळा असला तरी हे कपल्स खूप आनंदात राहत आहेत. याच पार्श्वभूमीवर या जोड्या कोणत्या आहेत? ते जाणून घेऊ या....
सुनील दत्त – नरगीस
वेगवेगळा धर्म असूनही प्रेमापोटी सुनील दत्त आणि नरगीस एकत्र आले होते. या दोघांचीही भएट मदर इंडियाच्या सेटवर झाली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात नरगीस यांनी सुनील दत्त यांच्या आईची भूमिका केली होती. याच चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांसोबत लग्न केलं होतं.
शाहरुख खान – गौरी
शाहरुख खान आणि गौरी खानची लव्ह स्टोरी तर जगप्रसिद्ध आहे. शाहरुख खान धर्माने मुस्लीम आहे तर गौरी खान ही धर्माने हिंदू आहे. मात्र या दोघांनीही धर्माचा विचार न करता एकमेकांशी लग्न केलं. या दोघांनही हिंदू विवाहपद्धतीने लग्न केलं होतं.
सैफ अली खान – करीना कपूर
करीना कपूर ही सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे. सैफ धर्माने मुस्लीम तर करीना कपूर ही हिंदू धर्माची आहे. मात्र एकमेकांवर जीव जडल्यामुळे या दोघांनीही धर्माचा विचार मागे सोडत एकमेकांशी लग्न केलं.
इरफान खान – सुतापा
इरफान खान बॉलिवुडमधील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जायचे. मात्र त्यांचे दीर्घ आजारामुळे अकाली निधन झाले. इरफान खान यांच्या पत्नीचे नाव सुतापा सिकदर असे आहे. त्यांची भेट नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये झाली होती.
इमरान खान – अवंतिका
इमरान खान आमि अवंतिका यांनी बऱ्याच काळ एकमेकांना डेट केलं. त्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2011 साली त्यांचे लग्न झाले होते. या दोघांनाही एक छान मुलगी आहे.
मनोज बाजपेयी – नेहा
मनोज बाजपेयी हे फिल्मी दुनियेतील सर्वपरिचित नाव आहे. त्यांनी एका मुस्लीम धर्मीय मुलीशी लग्न केलेल आहे. मनोज वाजपेयी यांच्या पत्नीला सर्वजण नेहा या नावाने ओळखतात. मात्र त्यांचे खरे नाव सबाा रजा असे आहे. या दोघांनीही एकमेकांना सात वर्षे डेट केलं. त्यानंतर 1998 मध्ये त्यांनी लग्न केलं होतं.
दिया मिर्जा – वैभव रेखी
दीया मिर्जा या प्रसिद्ध अभिनेत्रीने 2021 साली उद्योगपती वैभव रेखी यांच्याशी हिंदू पद्धतीने विवाह केला होता. याआधी दिया मिर्झाने 2014 साली प्रोड्युसर साहील सिंघा यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र नंतर त्यांचा घटस्फोट झाला.
संजय दत्त – मान्यता
संजय दत्त आणि मान्यता यांची जोडी बॉलिवुडमध्ये प्रसिद्ध आहे. मान्यता या मुस्लीम धर्मीय आहेत. तर संजय दत्त हा हिंदू आहे. मान्यता यांचं खरं नाव दिलनवाज शेख असं आहे. त्यांनी 2008 साली लग्न केलं होतं.
हेही वाचा :
स्विमिंग पूल, मोठं गार्डन अन् बरंच काही, अल्लू अर्जुनचं 100 कोटींचं घर नेमकं कसं?
Sunny Leone : सनी लिओनीच्या बँक खात्यात सरकारकडून महिन्याला एक हजार जमा! प्रकरणाचा भांडाफोड होताच...