यशशिखरावर पोहोचलेली 'ही' सेलिब्रिटी ओळखली?
सध्या सोशल मीडियावर एका गोंडस चिमुकलीचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. कलाविश्वात अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्री सध्या अनेकांच्याच गळ्यातील ताईत आहे.

मुंबई : सध्या सोशल मीडियावर एका गोंडस चिमुकलीचा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. कलाविश्वात अगदी कमी वेळातच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्री सध्या अनेकांच्याच गळ्यातील ताईत आहे. अभिनयासोबतच भन्नाट चारोळ्यांसाठीही ती ओळखली जाते. सोशल मीडियावर मजेशीर व्हिडीओ पोस्ट करत आपल्या याच अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीचं नातं एका राजेशाही कुटुंबाशी जोडलं गेलं आहे. आतापर्यंत या सेलिब्रिटीचं नाव तुमच्या लक्षात आलं असेलच.
हिंदी कलाविश्वातील नवाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता सैफ अली खान याची ही लाडाची लेक, सारा अली खान. साराच्या बालपणीचा एक सुरेख फोटो सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बालणीची सारा आणि तिच्या चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य पाहण्याजोगं आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
साराची आत्या, म्हणजेच सैफ अली खान याची बहीण, सबा अली खान हिनं आपल्या भाचीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सबानं यापूर्वीही कुटुंबातील सदस्यांची काही जुनी छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केली होती. या छायाचित्रांमुळं पतौडी कुटुंब आणि त्यांचा राजेशाही थाट सर्वांचं लक्ष वेधून गेला. त्यातच या फोटोच्या रुपात एक प्रकारे भरच पडली आहे. सबानं सोशल मीडियावर हा फोटो शेअर केल्यानंतर लगेचच चाहत्यांनी त्यावर कमेंट करत ही चिमुरडी कोण, ते लगेचच ओळखलं. सोशल मीडियावर सक्रिय असणारी सारा आता तिचा हा फोटो पाहून काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.























