'टेक्नीक ही गलत है', परिणीती चोप्राच्या 'सायना' चित्रपटाची नेटकऱ्यांकडून खिल्ली
अभिनेत्री परिणीती चोप्रा हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर चाहत्यांच्या भेटीला आणला. पण, याच कारणामुळं तिला सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकारही व्हावं लागलं
मुंबई : अभिनेत्री परिणीती चोप्रा हिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर चाहत्यांच्या भेटीला आणला. पण, याच कारणामुळं तिला सोशल मीडिया ट्रोलिंगचा शिकारही व्हावं लागलं. एकिकडे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या ‘The Girl On The Train’ च्या वाट्याला आलेल्या यशामुळं परिणीतीवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच दुसरीकडे 'सायना' (saina) या चित्रपटाच्या पोस्टरमुळं मात्र अनेकांनीच तिची खिल्लीही उडवल्याचं पाहायला मिळत आहे.
परिणीतीनं तिच्या या आगामी चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आणला. चित्रपटाचा पोस्टर चाहत्यांच्या नजरेस पडताच त्यामधील चुकीच्या गोष्टी अधोरेखित करणाऱ्यांची रिघ लागली.
चित्रपट हा बँडमिंटनपटू सायना नेहवालच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर बेतलेला असल्यामुळं या खेळाशीच संबंधित असा शटल दाखवण्यात आला आहे. सर्व्हिस देण्यापूर्वी शटल हवेत उडवतानाच्या क्षणांचा आधार घेत हे कलात्मक पोस्टर साकारण्यात आलं खरं, पण मुळातच बॅडमिंटनचं शटल अशा पद्धतीनं उडवलं जात नसल्याचं सांगत ही टेनिस खेळातील सर्व्हिसची पद्धत असल्याचीच बाब अनेकांनी निदर्शनास आणून दिली.
SAINA NEHWAL BIOPIC RELEASE DATE... #Saina - starring #ParineetiChopra essaying the part of renowned badminton player #SainaNehwal in the biopic - to release on 26 March 2021... Directed by Amole Gupte... Produced by Bhushan Kumar, Krishan Kumar, Sujay Jairaj and Rasesh Shah. pic.twitter.com/gvxm4YR56m
— taran adarsh (@taran_adarsh) March 2, 2021
I guess the graphics designing team got confused between badminton and tennis https://t.co/dTxNXbVM2n
— Vibhash (@iamvibhash) March 2, 2021
I got confused between Saina and Sania seeing the shuttle being served like that!! https://t.co/l3PJPAYlIS
— Pragya Rathore (@pragsrats) March 2, 2021
How did Saina approve of this poster? #serve #balltoss https://t.co/kl9ve87UlQ
— Surya Gune (@suryagune) March 2, 2021
... आणि त्या इसमानं थांबवली अजय देवगणची कार ही एक चूक चित्रपटाला भलत्याच कारणामुळं चर्चेत आणण्यास कारणीभूत ठरली. ट्विटरवरही सायना या चित्रपटाचा ट्रेंड पाहायला मिळाला. अर्थात यामागची कारणं मात्र वेगळी होती. काहींनी तर, सायनानं या पोस्टरला सहमती दिलीच कशी असाही प्रश्न उपस्थित केला आहे. तेव्हा आता यावर चित्रपटातील कलाकार मंडळी नेमकं काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.