Bollywood Actress Struggle Life: तीन मुलांच्या बापाशी 'या' अभिनेत्रीनं थाटला संसार, कधीच पदरात पडलं नाही आई होण्याचं सुख; बहिणीचं मुल दत्तक घेऊन त्याला दिलं नाव, ओळखलं का कोण?
Bollywood Actress Struggle Life: बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री इथे झाला.खरं तर या अभिनेत्रीनं आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात दाक्षिणात्या सिनेमांमधून केली.

Bollywood Actress Struggle Life: 70 च्या दशकाच्या मध्यात आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अभिनेत्रीनं 90च्या दशकापर्यंत मोठ्या पडद्यावर राज्य केलं. अभिनेत्रीनं तिच्या सौंदर्यासोबतच तिच्या अभिनयानं चाहत्यांना बराच काळ बांधून ठेवलं. बॉलिवूडमधली (Bollywood) कारकीर्द यशस्वी असलेल्या या सुपरस्टार अभिनेत्रीला तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र, फारच वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. या अभिनेत्रीनं बरंच दुःख सोसलं.
बॉलिवूड (Bollywood Actress) गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) राजमहेंद्री इथे झाला. खरं तर या अभिनेत्रीनं आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात दाक्षिणात्या सिनेमांमधून केली. यानंतर मात्र अभिनेत्री हिंदी चित्रपटांकडे वळली. तिनं बॉलिवूडमधला तिचा काळ अक्षरशः गाजवला. त्या काळात तिनं सर्वच्या सर्व बड्या अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली. पण, तिला वैयक्तिक आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. आम्ही प्रसिद्ध अभिनेत्री आणि तीन वेळा खासदार राहिलेल्या जया प्रदा (Jaya Prada) यांच्याबद्दल बोलत आहोत.
View this post on Instagram
जया प्रदा यांनी 70 च्या दशकाच्या मध्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि 90 च्या दशकापर्यंत मोठ्या पडद्यावर राज्य केलं. दरम्यान, जया प्रदा निर्माते श्रीकांत नाहटा यांच्या प्रेमात पडल्या. पण, ज्यावेळी दोघांचं सूत जुळलं, त्यावेळी श्रीकांत आधीच विवाहित होते. एवढंच नाहीतर त्यांना तीन मुलंही होती. पण तरीसुद्धआ दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी अचानक लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली.
जया-श्रीकांत यांनी 1986 मध्ये बांधली लग्नगाठ
जया आणि श्रीकांत यांचं लग्न 1986 मध्ये झालं. हा तो काळ होता, जेव्हा जया यांची कारकीर्द शिखरावर होती. या काळात, त्या निर्मात्यांची पहिली पसंती असायच्या. त्या काळात अनेकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या जया प्रदा स्वतः विवाहित आणि तीन मुलांचा बाप असणाऱ्या श्रीकांत नाहटा यांच्या प्रेमात पडली होती. दोघ एकमेकांच्या प्रेमात एवढे आकंठ बुडाले होते की, श्रीकांत यांना ते विवाहित असल्याचा आणि त्यांना तीन मुलं असल्याची पर्वाही राहिली नव्हती.
लोक म्हणायचे, 'दुसरी बाई'
जया प्रदा यांनी 'बॉलिवूड मेमरीज'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, श्रीकांत यांनी त्यांचे काही चित्रपट प्रोड्यूस केले होते आणि त्यांनी जया प्रदा यांच्या वाईट काळात खूप मदत केली होती. यानंतर, दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि श्रीकांत यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच, जयाशी दुसरं लग्न केलं. श्रीकांतनं असं केल्यामुळे लोक जया यांना 'दुसरी बाई' असंही म्हणू लागले. प्रेम स्विकारुन, समाजाला धुडकावून श्रीकांत यांनी जया प्रदा यांच्याशी लग्न केलं खरं, पण विवाहित असूनही, अभिनेत्रीला पत्नीचा दर्जा मिळू शकला नाही.
आई होण्याचं सुख मिळालं नाही, बहिणीच्या मुलाला दत्तक घेतलं
जया प्रदा यांनी हिंदी, कन्नड, तमिळ, तेलगू, मराठी आणि बंगाली सिनेसृष्टी गाजवली. पण, सिनेक्षेत्रात मोठ्ठं नाव असलेल्या जया प्रदा वैयक्तिक आयुष्यात मातृत्त्वाच्या ओढीनं व्याकूळ झालेल्या. त्यांना आई म्हणणारं कुणीतरी त्यांच्या आयुष्यात हवं होतं. पण, जया प्रदा यांना आई होण्याचा आनंद मात्र, मिळू शकला नाही. त्यानंतर अभिनेत्रीनं मोठा निर्णय घेतला. अभिनेत्रीनं सख्ख्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेतलं आणि त्याचा सांभाळ केला. सम्राट आता मोठा झाला असून तो स्वतः एक स्टार आहे. सध्या सम्राट दाक्षिणात्य सिनेसृष्टीत काम करतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























