दीपिकाकडून इन्स्टाग्राम, ट्विटर अकाऊंटवरील सर्व पोस्ट डिलीट
प्रेक्षकांचं अमाप प्रेम मिळणारी आणि लाखोंच्या घरात फॉलोअर्स असणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. पण, अचानकच तिनं हे पाऊल का उचललं हाच प्रश्न अनेकांच्या मानात घर करत आहे.
मुंबई : प्रेक्षकांच्या मनाता ठाव घेणारी अभिनेत्री (Depika padukone) दीपिका पदुकोण हिनं कलाविश्वात फार कमी कालावधीत लोकप्रियतेचं शिखर गाठलं. पाहता पाहता तिनं या झगमगणाऱ्या विश्वात आपं भक्कम स्थानही निर्माण केलं. अबाधित स्थानी पोहोचल्यानंतर अभिनेत्रीनं तिच्या खासगी आयुष्यावरही लक्ष केंद्रीत करण्यास सुरुवात केली. दीपिका हल्लीच चर्चेत होती ती म्हणजे नव्या वर्षाच्या स्वगातासाठीच्या तिच्या राजस्थान दौऱ्यामुळं.
पती रणवीर सिंह याच्यासह तिनं थेट राजस्थान रोखानं प्रवास सुरु केला होता. सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असणारी अभिनेत्री दीपिका आता या New Year सेलिब्रेशचे फोटो पोस्ट करणार अशीच तिच्या फॉ़लोअर्सना प्रतीक्षा असताना तिनं मात्र वेगळंच पाऊल उचललं. एकाएकी दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम आणि ट्विचरवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या. तिच्या या निर्णय़ानं अनेकांच्याच भुवया उंचावल्या.
दीपिकानं सोशल मीडिया पोस्ट डिलीट करताच, यावर अनेक प्रश्नही उपस्थित करण्यात आले. तिनं असं नेमकं का केलं असावं हाच प्रश्न चाहत्यांना पडला. कोण म्हणालं तिच्या आगामी चित्रपटासाठीचं प्रसिद्धी तंत्र म्हणून तिनं असं केलं असावं, तर कोणी यामागं आणखीही कारणं असू शकतात अशी शक्यता वर्तवली. आता यामागे नेमकं कारण आहे तरी काय, याची कोणालाच माहिती नसल्यामुळं दीपिकाच याबाबत नेमकं काय स्पष्टीकरण देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
VIDEO | 'मै कैसा मुसलमान हूँ?', अखेर नसिरुद्दीन शाह व्यक्त झालेच
मागच्याच महिन्याल लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करणाऱ्या दीप-वीर या सेलिब्रिटी जोडीनं यंदाच्या वर्षी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी राजस्थानला प्राधान्य दिलं. तिथं रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि त्यांच्या कुटुंबीयांसहसुद्धा या जोडीनं वेळ व्यतीत केला.
दीपिकाच्या आगामी प्रोजेक्टबाबत सांगावं तर, ती पती रणवीर सिंह याच्यासह '`83' या चित्रपटातून स्क्रीन शेअर करणार आहे. 1983 मध्ये भारतीय क्रिकेट संघानं जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषक विजयाभोवती चित्रपटाचं कथानक फिरणार आहे. हा चित्रपट 2020 मध्येच प्रदर्शित होणार होता, पण कोरोना व्हायरसच्या महामारीमुळं चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढं ढकलण्यात आली.