बधाई हो : आयुष्मान- ताहिराच्या कुटुंबात नव्या सदस्याचं स्वागत
आजारपणावर मात करत जगण्याचा मनमुराद आनंद घेणाऱ्या आयुष्मानच्या पत्नीनं म्हणजेच ताहिरा कश्यप हिनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत याविषयीची माहिती दिली. जे पाहताच चाहत्यांनीही शुभेच्छा देण्यास सुरुवात केली.
मुंबई : ‘मोस्ट हॅपनिंग’ म्हणा किंवा ‘मोस्ट इन्स्पायरिंग’, अर्थात अनेक जोडप्यांसाठी आदर्श ठरणाऱ्या अभिनेता आयुष्मान खुराना ayushmann khurrana आणि त्याची पत्नी ताहिरा कश्यप tahira kashyap यांनी नुकतीच एक गोड बातमी शेअर केली. बहुरंगी भूमिका साकारत कलाविश्वात यशशिखरावर असणारा आयुष्मान म्हणजे अनेकांसाठी एका परिपूर्ण पुरुषाची परिभाषाच.
मुख्य म्हणजे कैक तरुणींसाठी तो ‘आयडियल मॅन’. आयुष्मान रुपेरी पडद्य़ावर जितक्या सराईतपणे वावरतो आणि मनोरंजन करता करता प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतो त्याचप्रमाणं तो एक पती, पिता, भाऊ आणि मुलगा म्हणूनही अतिशय जबाबदारीनं आपल्या भूमिका बजावत असतो. सध्या हाच ‘हँडसम हंक’ चर्चेत आहे ते म्हणजे त्याच्या कुटुंबात आलेल्या एका नव्या सदस्यामुळं. या सदस्याच्या येण्याची माहिती मिळताच चाहत्यांनीही त्याच्यावर आणि त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळालं.
आयुष्मानच्या कुटुंबातील नवं सदस्य आहे तरी कोण, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? तर, ती आहे ‘पीनट’. पीनट ही आहे एक लहानसं Puppy. अतिशय गोड अशा या कुत्र्याच्या पिलाचा फोटो शेअर करत ताहिरा कश्यप म्हणजेच आयुष्मानच्या पत्नीनं तिच्याबाबतची एक छोटीशी गोष्टही सर्वांना सांगितली आहे.
‘पीनट’ची ओळख करुन देत ताहिरा म्हणाली...
‘आमच्या कुटुंबातील नवी सदस्य. ही मुलगी आहे.... ही आहे पीनट. माज्या केसांच्या एक्सटेंशनप्रमाणंच पीनटचीही एक गोष्ट आहे. ज्या व्यक्तीनं आम्हाला पीनटपर्यंत पोहोचण्यास मदत केली त्यांनी आम्हाला सांगितलं की लोक कायमच प्राधान्य मुलांना देतात. पण पीनटचा भाऊ कितीही सुरेख असला तरीही त्यानं काहीच फरक पडत नाही. मी तिला कधीही सेकंड चॉईस बनवू इच्छित नव्हते. तुम्ही सगळेच तिचं स्वागत करा’.
View this post on Instagram
पीनटसोबतचे काही फोटो शेअर केल्यानंतर लगेचच कमेंट बॉक्समध्ये खुराना कुटुंबतील या नव्या पाहुणीचं चाहत्यांनीही स्वागत केलं. ताहिरा कायमच तिच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष वेधत असते. कोणा एका महत्त्वाच्या विषयावर मत मांडणं असो किंवा एखाद्या नव्या गोष्टीबाबत चाहत्यांना माहिती देणं असो. ताहिरा कधीही यामध्ये कुठंही मागे नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.