Ashram 3 : प्रतीक्षा संपली! बाबा निराला पुन्हा येणार; आश्रम-3 चा मोशन पोस्टर रिलीज
नुकताच बॉबीनं या सीरिजचा मोशन पोस्टर रिलीज केला आहे.

Ashram 3 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) यांच्या आश्रम या सीरिजला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या सीरिजचा पहिला आणि दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता तिसऱ्या सिझनची वाट प्रेक्षक आतुरतेने पाहात होते. नुकताच बॉबीनं या सीरिजचा मोशन पोस्टर रिलीज केला आहे. या पोस्टरमध्ये तीन लिहिलेलं दिसत आहे.
बॉबी देओलसोबतच ईशा गुप्तानं देखील हा मोशन पोस्टर तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामुळे ईशा देखील या सीरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
बॉबी आणि ईशा या कलाकारांनी आश्रम 3 (Ashram 3) ची घोषणा केल्यानंतर आता या नव्या सिझनची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात आहेत. मोशन पोस्टरसोबत सीरिजच्या रिलीज डेटची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. आश्रम या सीरिजच्या पहिल्या दोन सिझनमध्ये अभिनेता बॉबी देओलनं बाबा निराला ही भूमिका साकारली आहे. काशीपूर येथील एका काल्पनिक कथेवर या सीरिजचं कथानक आधारित आहे.
View this post on Instagram
ड्रग्स, गुंड आणि राजकारण या सर्व गोष्टींवर आधारित असलेल्या आश्रम सीरिजच्या तिसऱ्या सिझनमध्ये नक्की काय दाखवले जाईल? याबाबत सध्या प्रेक्षक विचार करत आहेत.
संबंधित बातम्या
- Avatar 2 : एक-दोन नव्हे 'अवतार'चे तब्बल चार सिक्वेल येणार, प्रत्येकात दिसणार निळ्या विश्वाची जादू!
- KGF 2 in South Korea : भारतच नव्हे, दक्षिण कोरियातही दिसली ‘रॉकी भाई’ची जादू! चित्रपट पाहून चाहते म्हणाले...
- Zollywood : ‘झॉलीवूड’मध्ये झळकणार झाडीपट्टीचे 130 कलाकार, ‘या’ दिवशी चित्रपट रिलीज होणार!
Before You Go
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष






















