Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये उडता पंजाब! NCBची अचानक धडक, दोघांनी अंमली पदार्थ घेतल्याचं तपासणीत स्पष्ट
Diljit Dosanjh Concert: दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमात अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई..

Diljit Dosanjhs Mumbai Concert: प्रसिद्ध गायक (Punjabi Singer) दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखला जातो. गायक कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गायक दिलजीत याचा कॉन्सर्ट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण चर्चेत येण्यामागचं कारण वेगळं आहे. मुंबईत आयोजित कार्यक्रमात अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) (NCB) मोठी कारवाई केली आहे. मिळालेला माहितीनुसार या कॉन्सर्टमध्ये, ड्रग सेवन केल्याच्या आरोपाखाली दोन संशयित जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात.
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज सेवनाचा प्रकार उघड! दिलजीत दोसांझच्या कार्यक्रमात NCBची मोठी कारवाई, दोन जणांना अटक (Diljit Dosanjh's Mumbai Concert Makes Headlines After NCB Action)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील महालक्ष्मी रेस कोर्स येथे पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचे कॉन्सर्ट पार पडले. या कॉन्सर्टमध्ये चाहत्यांची ओसंडून गर्दी पहायला मिळाली. दरम्यान, यात केनियन नागरिकासह 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कॉन्सर्टला आलेल्या दोघांनी अंमली पदार्थ घेतल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले.
अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या नव्या व्हॅनच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात आली होती. एकूण 40 टेस्ट केल्या, त्यात दोघांच्या टेस्ट केल्याने, त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर, दोघांना एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाईसाठी ताडदेव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. माहीतीनुसार, पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचा कार्यक्रम, शुक्रवारी 27 नोव्हेंबरला पार पडला. सध्या या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, मोठ्या कार्यक्रमांमध्ये अंमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी एनसीबीने उचललेले पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















