एक्स्प्लोर

‘Animal’मध्ये रणबीर कपूरला झाकोळलं, चाहत्यांच्या प्रतिक्रियेवर बॉबी देओल म्हणाला, 'मला फक्त 15 मिनिटं..', चाहते घायाळ

बाप-लेकाच्या नात्यावर आणि सूडाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट ₹915 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी ठरला.

Bobby Deol: बॉलीवूडचा ‘लॉर्ड’ बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘Animal’ चित्रपटात रणबीर कपूरसमोर खलनायकाची भूमिका साकारत त्याने बॉलीवूडमध्ये जबरदस्त कमबॅक केलं. जरी बॉबीचा रोल फक्त 15 मिनिटांचा असला, तरी त्या काही मिनिटांतच त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप सोडली. अनेकांनी तर सोशल मीडियावर म्हटलं की, “बॉबी देओलने रणबीरलाच झाकोळून टाकलं!” मात्र या चर्चेवर बॉबीचा दिलेला प्रतिसाद सगळ्यांच्या मनाला भावला आहे. (Animal Movie)

रणबीरला झाकोळल्याच्या चर्चेवर बॉबीचा प्रतिसाद

Filmygyanला दिलेल्या मुलाखतीत जेव्हा बॉबीला विचारलं गेलं की लोकांना वाटतं तू रणबीरला ओव्हरशॅडो केलंस, तेव्हा तो हसत म्हणाला, “असं काही नाहीये. रणबीरला तीन तास प्रेक्षकांना गुंतवून ठेवायचं होतं, आणि मला फक्त 15 मिनिटं. जर रणबीरने ते तीन तास नीट हाताळले नसते, तर माझ्या 15 मिनिटांना काहीच अर्थ उरला नसता.”

बॉबी पुढे म्हणाला, “माझ्या पात्राचा परिणाम तसाच झाला कारण रणबीरने आपला रोल अप्रतिम केलाय. जर त्याने ते नीट साकारलं नसतं, तर माझ्या एन्ट्रीलाही इम्पॅक्ट राहिला नसता. अॅक्शन फिल्म असो वा ड्रामा, हिरो आणि खलनायक दोघेही ताकदीचे असले पाहिजेत. सुरुवातीपासूनच हिरो जिंकणार हे माहीत असेल, तर थ्रिलच संपतं.”

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

बॉबीचा हा साधा, प्रामाणिक आणि जमिनीवरचा प्रतिसाद पाहून चाहत्यांनी त्याचं अक्षरशः कौतुक केलं. Redditवर या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर होताच, युजर्सनी त्याला “most secure actor” म्हणत कमेंट्सचा वर्षाव केला. एका युजरने लिहिलं, “कसलाही ईगो नाही, मत्सर नाही, फक्त शुद्ध अभिनेता!” तर दुसरा म्हणाला, “लॉर्ड बॉबी कायमच क्युट!” आणखी एका चाहत्याने लिहिलं, “आजच्या स्पर्धात्मक वातावरणात एवढं समंजस उत्तर देणारा अभिनेता क्वचितच दिसतो.” अशा प्रतिक्रिया नेटकरांनी दिल्या आहेत. 

‘Animal’ आणि पुढची वाटचाल

2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘Animal’ या अॅक्शन-ड्रामामध्ये रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना आणि त्रिप्ती डिंमरी यांच्या भूमिका झळकल्या. बाप-लेकाच्या नात्यावर आणि सूडाच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट ₹915 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी ठरला.

आता बॉबी देओल पुन्हा नव्या दमाने तयारीत आहे. त्याचा पुढचा चित्रपट ‘बंदर’ हा अनुराग कश्यप दिग्दर्शित थ्रिलर-क्राईम ड्रामा असून यात सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर नुकताच टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. याशिवाय बॉबी YRFच्या मोठ्या प्रोजेक्ट ‘Alpha’ मध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी वाघसोबत झळकणार आहे. हा चित्रपट ख्रिसमस 2025मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा संकल्प
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..

व्हिडीओ

Caught on Cam: अमरावतीत नवरदेव Sujalram Samudre वर चाकू हल्ला, ड्रोन कॅमेऱ्यात थरार कैद.
Shiv Sena NCP Dispute: पक्षचिन्ह वादावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख, अंतिम सुनावणी थेट 2026 मध्ये.
Maharashtra Politics : तळेगावमध्ये मामा-भाचे एकत्र, बाळा भेगडे-सुनील शेळके यांची युती जाहीर.
Jalna Politics: 'जो समोर उभा तो विरोधी पक्ष', Arjun Khotkar यांचा मित्रपक्ष भाजपला थेट इशारा
BJP's Washing Machine : 'ड्रग्ज माफिया शुद्ध करणारी भाजपची नवी मशीन', Omraje Nimbalkar यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda Discharged : 'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा संकल्प
'हिरो नंबर वन'ला रुग्णालयातून डिस्चार्ज, कमी काम आणि जास्त योग हे सूत्र पाळण्याचा संकल्प
Rashid Khan 2nd Marriage राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
राशिद खानसोबतची 'ती' गोरी गोरी पान सुंदरी कोण? व्हायरल फोटो कुठला, क्रिकेटरने लग्नाचंही स्पष्टच सांगितलं
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; 'त्या' महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
व्हाईट कॉलर दहशतवादी मॉड्यूल; एक डझन अटकेत अन् त्यामधील अर्धा डझन पेशाने चाळीशीच्या उंबरठ्यावरील डॉक्टर निघाले! 37 दिवसांपूर्वी लग्नात प्रोफेसर शाहीन भेटली अन्..
Eknath Shinde: फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
ह्रदयद्रावक... नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
अवघ्या 24 तासात दिल्ली, इस्लामाबादमध्ये भीषण बाॅम्बस्फोट; पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या, 'जोपर्यंत पाकिस्तानी लष्कर..'
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातच मराठी शाळा मोजते शेवटच्या घटका...नाशिकची पहिली माध्यमिक शाळा पडण्याचा घाट
Embed widget