एक्स्प्लोर

Bin Lagnachi Goshta Traile Out: नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी... 'बिन लग्नाची गोष्ट'मध्ये प्रिया बापट, उमेश कामत यांची क्युट जोडी; ट्रेलर पाहिलात?

Bin Lagnachi Goshta Traile Out : प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक यांच्या 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून या सिनेमात नात्यांची नवीन परिभाषा उलगडणार आहे.

Bin Lagnachi Goshta Traile Out : नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी 'बिन लग्नाची गोष्ट' ही गोड कथा आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आलं आहे. या चित्रपटात रिअल लाईफ कपल प्रिया बापट (Priya Bapat) आणि उमेश कामत (Umesh Kamat) परत एकदा रील लाईफमधून प्रेक्षकांना मोहवणार आहेत. दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री यापूर्वीही प्रेक्षकांना भावली होती आणि त्यामुळेच आता या चित्रपटाबद्दलचीही उत्कंठा आधीपासूनच वाढलेली आहे.  

ट्रेलरमध्ये कथा प्रिया, उमेश, निवेदिता सराफ (Nivedita Saraf) आणि गिरीश ओक (Girish Oak) यांच्याभोवती फिरणारी दिसतेय. प्रिया प्रेग्नन्ट असून, कामामुळे आणि छोट्या-मोठ्या गोष्टींमुळे प्रिया -उमेशमध्ये नोकझोकही दिसतेय. या नात्यातील गोड-तिखट प्रसंग दाखवतानाच, घरात मदतनीस म्हणून गिरीश ओक आणि निवेदिता सराफ दाखल होतात आणि इथून खरी कथा रंग घेऊ लागते. प्रिया काहीशी नाराज असल्याचं दिसतंय, तिच्या नाराजीमागचं कारण काय? गिरीश-निवेदिताच्या अटी काय आहेत? आणि या चौघांच्या नात्यांचा हा प्रवास नेमका कुठे नेणार? यांची उत्तरं प्रेक्षकांना चित्रपटगृहातच मिळणार आहेत. ट्रेलरमध्ये निवेदिता सराफ यांच्या पात्राचाही काही भूतकाळ असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यात गिरीश ओक यांच्यासोबतची त्यांची अनोखी केमिस्ट्री, प्रिया-उमेश यांचा गोड संसार आणि या चौघांमधली संवादांची टक्कर, प्रेक्षकांना भरपूर मनोरंजन देणारी ठरणार आहे, हे ट्रेलरमधून स्पष्ट होतं.

View this post on Instagram
 
A post shared by Priya Bapat (@priyabapat)

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले की, "एकदा प्रिया-उमेशच्या घरी गेलो असताना त्यांच्या वागण्यातली नैसर्गिकता, संवादातील सहजता बघून वाटलं, ही कथा त्यांच्याशिवाय कोण करणार? त्यांनाही ही कल्पना आवडली आणि त्यांनीही होकार दिला. तसेच निवेदिता ताई आणि गिरीश सरांची जोडी प्रेक्षकांना याआधीही आवडली आहे. त्यामुळे ही चौकडी एकदम परफेक्ट होती. हा चित्रपट फक्त नात्यांवर भाष्य करणारा नसून तो प्रत्येक प्रेक्षकाला स्वतःच्या आयुष्याशी जोडणारा आहे. नातं टिकवण्यासाठी परस्परांवरील विश्वास, मोकळेपणा आणि जिव्हाळा हाच खरा पाया आहे. या कथेत प्रेक्षकांना हे सगळं अनुभवता येईल." 

निर्माते नितीन वैद्य म्हणतात, "हा चित्रपट मनोरंजनासोबतच नात्यांच्या बदलत्या परिभाषेवर विचार करायला लावणारा आहे. आजच्या पिढीचं राहणीमान, नात्यांची व्याख्या, त्यातील संघर्ष आणि गोडवा हे सगळं ‘बिन लग्नाची गोष्ट’मध्ये पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट नक्की पाहावा कारण तो हसवतो, विचार करायला लावतो आणि नात्यांची सुंदरता नव्याने दाखवतो."

दरम्यान, गॉडगिफ्ट एंटरटेनमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स निर्मित 'बिन लग्नाची गोष्ट' 12 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केलं आहे. प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक,  सुकन्या मोने आणि संजय मोने यांच्या दमदार अभिनयाने सजलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नात्यांची नवी सफर ठरणार आहे.

पाहा ट्रेलर : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget