एक्स्प्लोर

Anurag Dobhal: बिग बॉस फेम यूट्यूबरकडून गुडन्यूज; वडील झाल्याचा आनंद, 21 दिवसांपूर्वी झाला होता कार अपघात

Bigg Boss OTT Fame Anurag Dobhal Welcomes Baby: बिग बॉस फेम प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोभाल रामनवमीच्या दिवशी वडील झाला आहे.

Bigg Boss OTT Fame Anurag Dobhal: बिग बॉस (Bigg boss) ओटीटी फेम प्रसिद्ध यूट्यूबर अनुराग डोभाल (Anurag dobhal) सध्या आपल्या वैयक्तिक कारणामुळे प्रचंड चर्चेत आहे. यूट्यूबरच्या आयुष्यात बरेच गोष्टी घडत आहे. त्याचा नुकताच इन्स्टाग्रामवर लाइव्ह (Instagram live) करत असताना भीषण अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली.  दरम्यान, या सर्व दु:खात त्याच्या आयुष्यात एक मोठी गोष्ट घडली आहे. अनुराग वडील झाला आहे.  रामनवमीच्या विशेष दिवशी अनुरागची पत्नी रितिकाने गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानं ही गुडन्यूज सोशल मीडियात शेअर केली आहे.  चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर कमेंट करुन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  

अनुराग वडील झाला (Anurag Dobhal news)

अनुरागची पत्नी रितिकाने आपल्या बाळाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिनं ही गुडन्यूज इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर बाळाच्या पायांचे फोटो शेअर केले आहेत. तिनं आपल्या पोस्टमध्ये बाळाचा चेहरा दाखवलेला नाही.  या जोडप्याला मुलगा झाला आहे की मुलगी हे अद्याप  उघड झालेले नाही. मात्र, हे जोडपे सध्या बाळाच्या आगमनाने प्रचंड खूश झाले आहेत.

रितिकाने पोस्टमध्ये बाळाच्या पायांसह जन्मतारखेचा उल्लेख केला आहे. तिच्या बाळाचा जन्म 27 मार्च 2026 रोजी झाला.  रितिकाने पोस्ट शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिले की, 'रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, देवाने आम्हाला आमची सर्वात अनमोल भेट दिली आहे'. सध्या रितिकाने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. रितिकाची पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी कमेंट करुन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच बाळावर प्रेम आणि आशीर्वादाचा वर्षाव केला आहे. 

अनुराग अजूनही जखमेनं तडफडतोय

गेल्या काही काळापासून अनुराग डोभाल  चर्चेत आहे. त्यानं यूट्यूब व्हिडीओद्वारे आपल्या फॅमिलीबाबत अनेक खुलासे केले होते. कुटुंबामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं. अनुरागने इन्स्टाग्रामवर लाइव्ह सेशनदरम्यान,  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याची भरधाव कार थेट एका डिव्हायडरला जाऊन धडकली.  या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली.  या भीषण अपघातात त्याच्या नितंबाच्या हाडांना दुखापत झाली असल्याची माहिती आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून, त्याला चालणे आणि फिरण्यास अडचण होत आहे. 

या कठीण काळातही अनुरागला आनंद झाला आहे. त्याच्या घरी नवीन बाळाचे आगमन झाले आहे.  वडील झाल्याचा त्याला खूप आनंद झाला आहे. त्यानं बाळासोबत काही फोटो क्लिक केले.  दरम्यान, चाहत्यांना आशा की, वडील झाल्यानंतर अनुराग लवकर त्याच्या नैराश्यातून बाहेर पडेल. 

महत्त्वाच्या बातम्या

Bollywood First Hit Mother: 16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
16व्या वर्षी लग्न, 4 मुलांची आई अन् इंग्रजांविरोधात बंड... दारुड्या पतीला सोडलं, सिनेमातील पहिली ग्रॅड्युएट अभिनेत्री अन् पहिली 'हिट आई' कोण?
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Embed widget