Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : अभिनेत्री वर्षा उसगांवकर, गायक अभिजीत सावंतसह कोकण हार्टेड गर्ल; बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांची यादी पाहा
Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : बिग बॉस मराठीसाठी अवघ्या काही तासांची प्रतीक्षा उरली आहे. घरात कोणते कलाकार सहभागी होणार याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे.

Background
Bigg Boss Marathi Season 5 Live Updates : मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला बिग बॉस मराठीच्या पाचव्या (Bigg Boss Marathi Season 5) सिझनची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज म्हणजेच 28 जुलै रोजी हा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर रात्री 9 वाजता बिग बॉस मराठीचा ग्रँड प्रिमिअर होणार आहे. त्यामुळे घरात कोण कोण जाणार हे आता अवघ्या काही तासांमध्ये समोर येईल.
बिग बॉसच्या सिझनची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. त्यातच पहिल्यात प्रोमोमध्ये प्रेक्षकांना एक मोठं सरप्राईज मिळालं. यंदा बिग बॉसच्या होस्टच्या खुर्चीत रितेश देशमुख बसणार आहे. त्यामुळे तो त्याच्या स्टाईलने घरातल्या स्पर्धकांची शाळा घेणार आहे. अनेक दिवसांपासून या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हे स्पर्धक होणार सहभागी?
बिग बॉसकडून काही स्पर्धकांचे नॉन रिव्हिल प्रोमो देखील शेअर करण्यात आले आहेत. यामध्ये गायक अभिजीत सावंत याच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्याचप्रमाणे एका परदेसी गर्लचा देखील प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे ही परदेसी गर्ल कोण असणार याची देखील उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेता शुभंकर तावडे देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. कारण शुभंकरच्या सोशल मीडिया पोस्टवरुन तो घरात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच सोशल मीडिया स्टार अंकिता वालावलकर हिच्या देखील नावाची जोरदार चर्चा आहे.
रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार
काही दिवसांपूर्वीच 'बिग बॉस मराठी'चा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. या प्रोमोवरुन रितेश भाऊमुळे 'बिग बॉस' आणखी ग्रँड होणार असल्याचं स्पष्ट झालं. अशातच आता पुन्हा एकदा नव्या पर्वाचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सुपरस्टार रितेश देशमुख यंदाचा सीझन वाजवायला सज्ज आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Contestant List : बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झालेल्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
छोटा पुढारी, कोकण हार्टेड गर्ल, वर्षा उसगावकर ते इराना रुडाकोवा, मराठी बिग बॉसच्या घरातील नावे अखेर समोर
Suraj Chavan Bigg Boss Marathi 5 : टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात
Bigg Boss Marathi 5 : टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या घरात सगळ्यांना गुलीगत चीत करायला दाखल झाला आहे.
View this post on Instagram























