एक्स्प्लोर

बिग बॉस फेम मराठी अभिनेत्याचा पार पडला साखरपुडा; त्याची स्वप्नसुंदरी कोण? खास फोटो सोशल मीडियात व्हायरल

Actor Vishal Nikam and Actress Akshaya Hindalkar’s Engagement Goes Viral: बिग बॉस मराठी फेम अभिनेता विशाल निकमचा साखरपुडा पार पडला. दोघांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल.

Actor Vishal Nikam and Actress Akshaya Hindalkar Engagement: 2025 साली अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले होते. 2026 च्या सुरूवातीला काही मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली. बिग बॉस मराठी फेम आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेतील 'राया' अर्थात   विशाल निकम सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विशालला त्याची सखी सापडली आहे. तो लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.  विशाल आणि त्याच्या आयुष्यातील स्वप्नसुंदरी  अभिनेत्री अक्षया हिंदळकर या दोघांचा नुकताच साखरपुडा पार पडला.  त्यांनी गुपचूप आपला साखरपुडा उरकला असून, या विशेष कार्यक्रमातील फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  

काही महिन्यांपूर्वी विशाल निकमने  आपल्या सखीसोबतचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. या फोटोतून त्याने थेट अभिनेत्रीचा चेहरा उघड केला नव्हता. दोघांचा रोमँटिक अंदाज पाहून   विशालच्या आयुष्यातील स्वप्नसुंदरी नक्की कोण? असा प्रश्न नेटकरी आणि चाहत्यांना पडला होता. दरम्यान, एका व्हिडिओतून दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली.  विशालच्या आयुष्यातील स्वप्नसुंदरी अभिनेत्री अक्षया हिंदळकर असून, ही माहिती उघड होताच चाहत्यांना आनंद झाला. दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला.  अक्षयाने काल खास मेहेंदीचे फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. तसेच साखरपुड्याचे फोटो शेअर केले.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by VISHHAL NIKAM (@vishhalnikam)

अक्षयाने या खासप्रसंगी हिरव्या रंगाची साडी नेसली होती. या साडीमध्ये अक्षया सुरेख दिसत होती. तर, विशालने गर्द पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला होता.  या पोस्टवर चाहते आणि नेटकऱ्यांनी कमेंट करून शुभेच्छांचा वर्षाव केला.  विशालने त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियात शेअर केले आहेत. या फोटोंवर त्यानं लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे. 'देव खरंच माझ्या बाजूने होता जेव्हा त्याने तुला माझ्यासाठी लिहिलं…' सध्या ही पोस्ट व्हायरल होत आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार,  विशाल आणि अक्षया यांचे लग्न गंगा घाटावर होणार आहे. हा लग्नसोहळा पाहण्यासाठी चाहत्यांनी उत्सुकता दर्शवली.

अभिनेत्री अक्षया हिंदळकर मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. तिची 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रचंड गाजली. अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. तिचे रील्स, व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होतात. तर, विशाल निकमला बिग बॉस मराठी आणि मालिकेतून  प्रसिद्धी मिळाली.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार, अमित शाहांनी पहिल्यांदाच भूमिका मांडली; लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही, लाठीचार्ज, गोळीबाराचे आदेश कुणी दिले? राहुल गांधींचा पलटवार
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सात जणांचा मृत्यू
Embed widget