एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: गिरकी घेताना कमरेवरचा टॅटू दिसला अन् चाहत्यांना कळलं बिगबॉसमधील स्पर्धकाचं नाव; प्रेक्षकांना घायाळ करणारी नखरेल गर्ल कोण?

नुकत्याच एका प्रोमोमध्ये सौंदर्य आणि बोल्ड अंदाज घेऊन घरातलं वातावरण हॉट - हॉट करायला येते ही नखरेल गर्ल असं म्हणत तिची ओळख करून देण्यात आली आहे.

Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठी सीजन 6 प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्याचे उत्सुकतेने वाट पाहिली जात होती तो बहुचर्चित रियालिटी शो 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे. रविवार पासून घरात स्पर्धकांची धमाल भांडण टास्क आणि मनोरंजनाचा तडका पाहायला मिळणार असून यंदाच्या सीजनमध्ये 16हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. शो सुरु होण्यास आता मोजकेच दिवस उरलेले असताना यंदा बिग बॉसच्या घरात कोणकोणत्या सेलिब्रेटी दिसणारी याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही उत्सुकता कलर्स मराठी वाहिनीने आणखी ताणली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडियावर बिग बॉस मधील स्पर्धकांचे प्रमुख हळूहळू समोर येत आहेत. 

नुकत्याच एका प्रोमोमध्ये सौंदर्य आणि बोल्ड अंदाज घेऊन घरातलं वातावरण हॉट - हॉट करायला येते ही नखरेल गर्ल असं म्हणत तिची ओळख करून देण्यात आली आहे. हा प्रोमो पाहताच ही स्पर्धक नेमकी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. पण प्रेक्षकही चतूर आहेत. प्रोमोमधील या तरुणीचा कमरेवरचा टॅटू बघून या प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्रीला ओळखलंय.  

तरुणीचा कमरेवरचा टॅटू बघून प्रेक्षकांनी ओळखलं

कलर्स मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये बोल्ड अंदाजात एक सौंदर्यवती येते. तिच्या अंदाजाने बिग बॉसच्या घरात धमाका होणार हे निश्चित असे बोलले जात आहे. सौंदर्य आणि बोल्डनेस घेऊन ही अभिनेत्रीच्या येण्याने स्टेजवर अक्षरशः माहोल बदलला आहे. तिचा धमाकेदार डान्स पाहताना चाहत्यांना तिच्या दंडावर आणि कमरेवर टॅटू असल्याचं पाहायला मिळालं. या टॅटूमुळे ही सुपर मॉडेल सोनाली राऊत असल्याचं प्रेक्षकांनी आधीच ओळखलं आहे. या प्रोमोवर चाहत्यांच्या असंख्य कमेंट्स आल्या आहेत. यात जवळपास अनेकांनी ही सोनाली राऊत असल्याचं म्हटलंय. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

कोण आहे सोनाली राऊत? 

सोनाली राऊत ही प्रसिद्ध मॉडल आणि अभिनेत्री आहे. रणवीर सिंगसोबत 2011 मध्ये एका मासिकासाठी हॉट अंदाजात एक फोटोशूट केल्यामुळे ती रातोरात लोकप्रिय झाली होती. हिंदी बिग बॉसच्या आठव्या सीजनमध्येही ती दिसली होती. या सीजन मुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. ती टॉप फाईव्ह मध्ये पोहोचली आणि तयारी न करता तिचा रोजच्या कपड्यांमध्ये ती स्टेजवर आली. तिची ही शैली प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती.  बिग बॉसच्या घरात झालेल्या नॉमिनेशन मध्ये तिला अचानक बाहेर काढण्यात आलं होतं. पण तिचे लोकप्रियता इतकी होती की तिला परत आणण्यात आलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Raut (@isonaliraut)

सोनाली राऊत ही लोकप्रिय मॉडेल उज्वला राऊतची धाकटी बहीण आहे. तिचे वडील उपायुक्त आहेत. सोनाली राऊतने किंगफिशर कॅलेंडर मॅक कॉस्मेटिक्स पीसी चंद्रा ज्वेलर्स लिमका इत्यादी अनेक मोठ्या ब्रँड साठी मॉडेल म्हणून काम केले आहे. 2014 मध्ये आलेल्या द एक्सपोज या बॉलिवूड चित्रपटात सोनालीने हिमेश रेशमी आणि हनी सिंग सोबत काम केलं होतं. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकही झालं होतं. आता बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात तिची एन्ट्री धमाकेदार होणार हे निश्चित.

महत्त्वाच्या बातम्या

Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Kangana Ranaut Hits Back at Trolls: कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
कंगना रनौतचा ट्रोलर्सना पुन्हा पलटवार; सिनेमातील क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांना सुनावले खडेबोल, म्हणाली...
Vishal Dadlani On PM Modi Video: 'हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा..' पीएम मोदींच्या व्हिडिओवर विशाल ददलानीची टीका; म्हणाला...
'हा अहंकार सोडा, PR कमी करा, फालतू रील्स बनवणं बंद करा..' पीएम मोदींच्या व्हिडिओवर विशाल ददलानीची टीका; म्हणाला...
Raj Thackeray on Bollywood: मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल
मोदींचं कौतुक करणारे अभिनेते विवेक ओबेरॉय, आर. माधवन दुबईला का शिफ्ट झाले? राज ठाकरेंचे खडे सवाल

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Embed widget