एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस आदेश देत आहेत…” आवाज घुमणार पुन्हा! नव्या घरात नवे नियम, दर आठवड्याला... , 100 दिवसांचा थरार

100 हून अधिक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत, तब्बल 100 दिवस चालणाऱ्या या प्रवासात अतरंगी स्वभावांचे बहुरंग, नात्यांचे बदलते पदर, प्रेम-मैत्री, मतभेद, भांडणं आणि चुरशीचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Bigg Boss Marathi 6: मराठी मनोरंजनाची ओळख बनलेला, ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र डोळे लावून पाहतो असा मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात भव्य आणि चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘BIGG BOSS मराठी’ पुन्हा एकदा नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. देशाचा लाडका सुपरस्टार, आपले लाडके ‘भाऊ’ रितेश देशमुख बिग बॉस मराठीचा नवा सीझन घेऊन येत आहेत. “बिग बॉस सांगू इच्छितात, बिग बॉस आदेश देत आहेत…” हा दमदार आवाज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या घराघरांत घुमणार आहे.

यंदा ‘बिग बॉस मराठी’चं घर नव्या रूपात, नव्या रचनेत आणि नव्या खेळाच्या नियमांसह सादर होत असून, “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” या रोमांचक थीमसह नव्या सदस्यांच्या स्वागतासाठी ते पूर्णपणे तयार आहे. 100 हून अधिक कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत, तब्बल 100 दिवस चालणाऱ्या या प्रवासात अतरंगी स्वभावांचे बहुरंग, नात्यांचे बदलते पदर, प्रेम-मैत्री, मतभेद, भांडणं आणि चुरशीचा खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

रितेश भाऊ उतरवणार खोटेपणाचे मुखवटे

बिग बॉसच्या घरातील सदस्य आणि प्रेक्षक यांच्यातील दुवा म्हणजे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक. मागील पर्वात आपल्या ठाम मतांमुळे, रोखठोक भूमिका, पण तितक्याच प्रेमळ स्वभावाने, साध्या-सहज व्यक्तिमत्त्वाने आणि गरज पडल्यास कडक शिस्तीच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारे, हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय सुपरस्टार रितेश देशमुख याही पर्वात सूत्रसंचालकाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. मागील सीझनमध्ये त्यांनी कधी मित्र, कधी मार्गदर्शक बनून सदस्यांना आरसा दाखवला, परखड मत व्यक्त केली आणि खोटेपणाचे मुखवटे उतरवले. हे सगळं यंदाही पाहायला मिळणार आहे. अस्सल महाराष्ट्रीयन स्वॅगसह रितेश देशमुख यंदा हा खेळ अधिक रंगतदार करणार असून, घरातील सदस्यांसह प्रेक्षकांवरही आपल्या सूत्रसंचालनाची छाप ते नक्कीच सोडतील. बनिजे आशियाने निर्मित केलेला ‘बिग बॉस मराठी’चा सीझन 6 एका दिमाखदार सोहळ्याद्वारे 11 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता, आपल्या लाडक्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानंतरचे भाग दररोज रात्री 8 वाजता प्रसारित होतील.

कुठलं दार कुणाचे नशीब बदलणार?

बिग बॉस सुरू होण्याआधीच संपूर्ण महाराष्ट्रात या सीझनमधील स्पर्धकांबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. प्रत्येक मराठी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असताना, यंदाही आपल्या खास स्टाईल आणि दिलखुलास अंदाजाने रितेश देशमुख ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनचे सूत्रसंचालन करत आहेत, याबाबत बोलताना रितेश देशमुख म्हणाले ,‘बिग बॉस मराठी’चं घर म्हणजे रोज नवं वळण आणि नवं आव्हान. पुन्हा एकदा या शोचं सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. यंदा कुठलं दार कुणाचं नशीब उघडेल, हे कुणालाच माहीत नाही. या शोची खरी मजा म्हणजे सदस्यांमधले लपलेले पैलू प्रेक्षकांसमोर आणणे. यंदाच्या सीझनमध्ये राडा, धुरळा, भावना आणि मस्ती सगळं काही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. सहाव्या सीझनसाठी सज्ज राहा, कारण यंदा ‘बिग बॉस मराठी’ अधिक बेधडक, अनपेक्षित आणि अगदी अस्सल मराठमोळा असणार आहे.”

कंटेंट धारदार ठेवण्यावर भर

यावर्षीच्या सीझनबद्दल आणि थीमबद्दल बोलताना Executive Vice President, Marathi Cluster, सतीश राजवाडे म्हणाले, “रिअॅलिटी शोच्या विश्वात ‘बिग बॉस’ची स्वतःची एक वेगळी ओळख आहे. मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ असून त्यांची आवड सतत बदलते. त्यामुळे सहाव्या सीझनसाठी आम्ही फक्त खेळ नाही, तर संपूर्ण अनुभव नव्याने घडवण्याचा निर्णय घेतला आहे. फॉरमॅट न बदलता कंटेंट अधिक धारदार ठेवण्यावर आणि प्रत्येक वयोगटाला सहभागी करून घेण्यावर आमचा भर आहे. 21 ते 55 वयोगटातील विविध विचारसरणी आणि स्वभावांचे स्पर्धक यंदा घरात पाहायला मिळणार आहेत. या सगळ्याला योग्य दिशा देण्यासाठी रितेश देशमुख यांच्यासारखा ठाम आणि संवेदनशील सुपरस्टार आमच्यासोबत असणं ही आमच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. ‘दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!’ या थीममुळे यंदाचा सीझन अधिक उत्सुकता निर्माण करेल हे नक्की.”

अनेक दारांनी सजलेलं भव्य घर

मराठी माणूस म्हटलं की गप्पा, चर्चा हि आलीच. वेगवेगळ्या विचारसरणीची माणसं एकत्र आली की भांडणं, रुसवे-फुगवे, मैत्री, प्रेम आणि स्पर्धा अपरिहार्य ठरते.‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदाही विविध क्षेत्रातील अतरंगी स्पर्धक एका छताखाली राहणार आहेत. यंदाच्या सीझनची सर्वात मोठी खासियत म्हणजे घराची आगळीवेगळी संकल्पना. यावर्षी 13000 चौरस फूट भव्य जागेत विविध क्षेत्रातील 16 हून अधिक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व सदस्य म्हणून घरात जाणार आहेत. अनेक दारांनी सजलेलं हे भव्य घर केवळ राहण्यासाठी नसून, तेच या खेळाचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे. प्रत्येक दारामागे एखादं आव्हान, एखादा धक्का किंवा एखाद्याचं नशीब बदलणारा क्षण दडलेला असेल. “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” ही केवळ टॅगलाईन नसून यंदाच्या सीझनचं मुख्य वैशिष्ट्य आहे. 

कसे असणार नियम?

घराचा दरवाजा पुन्हा एकदा उघडणार आहे. दर आठवड्याला किमान एका स्पर्धकाला घराबाहेर जाण्यासाठी इतर स्पर्धक तसेच प्रेक्षकांच्या मतांद्वारे नामांकन करण्यात येईल. जो स्पर्धक अंतिम फेरीपर्यंत बिग बॉसच्या घरात टिकेल, तो ठरेल ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 चा विजेता. नव्या पर्वाचा काउंटडाऊन सुरू झाला असून, पाहूया रितेश भाऊ यंदा या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत कसं करणार आणि कोण खेळात टिकणार! “दार उघडणार… नशिबाचा गेम पालटणार!” ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 – 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठी आणि JioHotstar वर.

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नितीन गडकरींकडून आधी काँग्रेस अन् राष्ट्रवादीवर टीकेचं आसूड; मग म्हणाले, 'आमच्या सोबतची राष्ट्रवादी तशी नाही..'
नितीन गडकरींकडून आधी काँग्रेस अन् राष्ट्रवादीवर टीकेचं आसूड; मग म्हणाले, 'आमच्या सोबतची राष्ट्रवादी तशी नाही..'
Weather Update: उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह सक्रिय, राज्यात तापमानाचा पारा घसरला! पुढील 2 दिवस तापमान कसे? 
उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह सक्रिय, राज्यात तापमानाचा पारा घसरला! पुढील 2 दिवस तापमान कसे?
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नितीन गडकरींकडून आधी काँग्रेस अन् राष्ट्रवादीवर टीकेचं आसूड; मग म्हणाले, 'आमच्या सोबतची राष्ट्रवादी तशी नाही..'
नितीन गडकरींकडून आधी काँग्रेस अन् राष्ट्रवादीवर टीकेचं आसूड; मग म्हणाले, 'आमच्या सोबतची राष्ट्रवादी तशी नाही..'
Weather Update: उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह सक्रिय, राज्यात तापमानाचा पारा घसरला! पुढील 2 दिवस तापमान कसे? 
उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह सक्रिय, राज्यात तापमानाचा पारा घसरला! पुढील 2 दिवस तापमान कसे?
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Badlapur BJP Nagarsevak Tushar Apte: बदलापूरमध्ये भाजपने लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक केलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट
बदलापूरमध्ये भाजपने लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला स्वीकृत नगरसेवक केलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट
Embed widget