Bigg Boss Marathi 6: काहींना झापलं काहींना गोंजारलं.. भाऊच्या धक्क्यावर कोणाची नाचक्की? बिगबॉसच्या घरात टॉप क्लास गेम कोणाचा होता?
बिग बॉस मराठी सीजन 6 च्या पहिल्या दिवसापासून घरातील सदस्यांमध्ये मतभेदांचेच वारे वाहत आहेत.

Bigg Boss Marathi 6: मराठी प्रेक्षकांना ज्याची उत्सुकता होती तो बहुप्रतिक्षित शो बिगबॉस मराठी 6 गेल्या आठवड्यापासून सुरू झाला आहे. बिग बॉसचा धक्का चांगलाच रंगला. रितेश भाऊंनी घरातील सदस्यांची चांगलीच शाळा घेतली. काहींना झापलं काहींना गोंजारलं. बिग बॉसच्या घरात गायिका प्राजक्ता शुक्रे ही घरातील पहिली कॅप्टन झाली. भाऊचा धक्क्यावर रितेश देशमुख यांनी तन्वी कोलतेला चांगलंच सुनावल. रुचिता जामदारला ही खडे बोल सुनावले. तर छोटा डॉन उर्फ प्रभू शेळके, सागर कारंडे या दोघांचं भरभरून कौतुकही केलंय.
बिग बॉस मराठी सीजन 6 च्या पहिल्या दिवसापासून घरातील सदस्यांमध्ये मतभेदांचेच वारे वाहत आहेत. रुचिता आणि तन्वी या दोघींचेच आवाज घरात ऐकू येतात. करण सोनवणेने घराची पॉवर की घेतल्यानंतर सोनालीशी बोलताना रुचिताची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं. विनाकारण वाद घेणाऱ्या या सदस्यांचा रितेश भाऊंनी खरपूस समाचार घेतला आहे.
कुणाची कानउघडणी, कुणाला शाबासकी ?
पहिल्याच भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊंनी तन्वी कोलतेला चांगलंच सुनावल्याच दिसलं. विनाकारण भांडणाऱ्या तन्वीला त्यांनी घरातील तंटा क्विन असं नाव दिलं. तर रुचिता जामदारला गेमच कळला नसल्याचं म्हणत स्वतःलाच पंजा मारणारी वाघीण असं म्हटलं.
संपूर्ण आठवड्यात तनवी कोलते केवळ भांडणावरच आहे असं रितेश भाऊ म्हणाले. तर रुचिता जामदारला बोलताना रितेश भाऊ म्हणाले की तुम्हाला गेमच कळाला नाही. ना गेम ची पडली आहे काही. त्यांना फक्त एक से एक डायलॉग मारता येतात.
अँग्री मॅन विशालला रितेश भाऊंचा दणका
राग येणे स्वाभाविक आहे .पण त्या गोष्टीची तुम्ही इमोशनली कनेक्ट आहात ही गोष्ट इतरांना माहित नाही याची जी व्हॅल्यू आहे ती तुमच्यासाठी आहे. एकमेकांची खालच्या स्तरावर जाऊन किंमत काढणं हे या शोमध्ये बंद केलं पाहिजे असं रितेश भाऊ म्हणताना दिसतात .
दादागिरी करणाऱ्या विशाल आणि ओमकारलाही रितेश भाऊंनी झापलं . बिग बॉस मराठी हा कुटुंबीयांसोबत बघितला जाणारा शो आहे . विशाल आणि ओमकार ला कशावरही काही बोलायचं नाही त्यांना फक्त मारामारी करायची आहे. स्वतःच्या ताकदीचा प्रचंड माज आहे. एकमेकांच्या अंगावर धावून जायचं, धक्काबुक्की करायची, धमक्या द्यायच्या .हे घर आहे रस्त्यावरचा नाका नाही. हे माझं घर आहे इथे दादागिरी नाही भाऊगिरी चालेल. असं म्हणत रितेश भाऊंनी दोघांनाही शब्दांचा मार दिला.
पहिला आठवडा कुणासाठी खास ?
भाऊचा धक्क्यावर रितेश भाऊंनी सागर कारंडे भरभरून कौतुक केल्याचा दिसलं. काय खेळला तुम्ही! जसे तुमच्या नाटकाला हाउसफुलचे बोर्ड लागतात .तसेच तुमच्या पहिल्या आठवड्यातल्या परफॉर्मन्सला हाउसफुल चे बोर्ड लागले आहेत. एंटरटेनमेंट चे नवे फंडे सागर कारंडे असं म्हणत रितेश भाऊंनी सागरचं कौतुक केला आहे.
View this post on Instagram
रितेश भाऊंनी प्रभूचही जोरदार कौतुक केलं. प्रभू बाहेरच्या दुनियेत तुम्ही एका कॅमेराने कंटेंट बनवता. इथे 100 कॅमेरा आहेत . तुम्ही हसवलत रडवलत. मी सगळ्यांना सांगू इच्छितोतुम्ही सगळे यांना छोटे समजत आहात .पण या आठवड्यातील हे खरे एंटरटेनमेंट चे डॉन आहेत. असं म्हणत प्रभू शेळकेचं कौतुक केलं .























