एक्स्प्लोर

Picture Boys Trailer: Bigg Boss नंतर ‘छोटा पुढारी’ची मोठ्या पडद्यावरची एन्ट्री चर्चेत; कॉमेडीचा ओव्हरडोस घेऊन येतोय नवा सिनेमा, 'पिक्चर बॉईज'चा ट्रेलर पाहिलात?

बिग बॉसच्या घरात घन:श्याम गेल्यानंतर तो लोकप्रीय झाला. आता त्याच्या मोठ्या पडद्यावरील एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Picture Boys Trailer: उन्हाळ्याच्या सुटीत कॉमेडीचा सुखद अनुभव देणाऱ्या पिक्चर बॉईज या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे. 15 मे रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून, चित्रपटांमध्ये हिरो होण्यासाठी धडपडणाऱ्या दोन तरूणांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहता येणार आहे.

 छोटा पुढारी घन:श्याम दरवडे हा कोणत्याही पक्षाचा नेता नसला तरी तो समजात घडणाऱ्या अनेक सामाजिक व राजकिय गोष्टींवर आपले मत परखडपणे मांडतो. मध्यंतरी त्याचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झालेले. पण बिग बॉसच्या घरात घन:श्याम गेल्यानंतर तो लोकप्रीय झाला. आता त्याच्या मोठ्या पडद्यावरील एन्ट्रीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

धमाल कथानक, उन्हाळ्याच्या सुट्टीत होणार पुरेपूर मनोरंजन 

पिक्चर बॉईज" या चित्रपटातून एक धमाल गोष्ट मांडण्यात आली आहे. चित्रपट क्षेत्राची फारशी काही माहिती नसलेल्या दोन तरुणांना हिरो व्हायचं असतं. चित्रपटाच्या क्षेत्रात आल्यानंतर त्यांच्या वाट्याला काय काय अनुभव येतात, त्यातून काय धमाल विनोदी प्रसंग घडतात याचं कथानक चित्रपटात मांडण्यात आलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधूनही त्याची झलक मिळत आहे. त्यामुळेच चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. मजेशीर कथानक, उत्तम लेखन, ताल धरायला लावणारं संगीत, दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. उन्हाळ्याच्या सुटीत पुरेपूर मनोरंजन करणारा पिक्चर बॉईज हा चित्रपट सहकुटुंब चित्रपटगृहात जाऊनच पाहावा लागणार आहे.

 

छोटा पुढारीसह दमदार स्टारकास्ट

त्रिमूर्ती फिल्म्सनं 'पिक्चर बॉईज' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी पांडुरंग पंडितपवार, राजा पांडुरंग पंडितपवार हे या चित्रपटाचे निर्माते असून शिवाजी केशव पाटील हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन निलेशसिंह राजपूत यांनी केलं आहे. मंदार चोळकर, सुनील दोडगे, संध्या-प्रनिकेत यांनी लिहिलेल्या गीतांना वरुण लिखाते आणि संध्या-प्रनिकेत यांनी संगीतबद्ध केले आहे. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. विनोद पाटील यांनी छायांकन, रोहन पाटील यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. आनंद शिंदे, जसराज जोशी, स्वप्नील गोडबोले, वरुण लिखाते, एल. के. लक्ष्मीकांत यांनी चित्रपटातली गाणी गायली आहेत. प्रतीक लाड, हंसराज जगताप, अरबाज शेख, पवन चुरे, घनश्याम दरोडे (छोटा पुढारी), प्रिया तुळजापूरकर, सूरज पाटील, किरण पाटील, नम्रता पोटे, निभिया शर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, प्रशांत तपस्वी, मिलिंद दास्ताने, विजय खंदारे, साक्षी पंडितपवार, विजय गिते, अंकिता राऊत अशी नव्या जुन्या कलाकांची फळी चित्रपटात आहे. 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Sohail Khan Weight Loss: सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
सलमान खाननंतर त्याच्या भावाची चर्चा, सोहेल खानला झालं तरी काय? वेट लॉसवर सोडलं मौन, म्हणाला...
Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget