Bigg Boss 19 ticket to finale: या चार सदस्यांनी जिंकलं फिनालेचं तिकीट, फरहाना शहाबाजमध्ये जुंपली, तान्या रडली, नेमकं घडलं काय ?
बिग बॉसने मालती आणि शाहबाज यांना फिनालेच तिकीट मिळायला हवं की नाही याचा निर्णय घरातल्या स्पर्धकांवर सोपवला. यावर प्रत्येकाने आपापली मतं सांगितली.

Bigg Boss 19: बिग बॉसचा 19 वा सीजन आता अंतिम टप्प्यात आला आहे. 7 डिसेंबर रोजी बिग बॉसचा (Bigg Boss) ग्रँड फिनाले होणार आहे. आणि अर्थात त्याआधी तिकीट टू फिनाले टास्क बिग बॉसच्या घरात पार पडला. या टास्कमध्ये चार स्पर्धकांनी भाजी मारली. मात्र यावेळेस कोणताही स्पर्धक कॅप्टन बनला नाही. उलट पूर्ण घरंच नॉमिनेट झालं. याच दरम्यान फरहाना आणि शहाबाज यांचं कडाक्याचं भांडण झालं ज्यामुळे सगळ्यांचे लक्ष त्याकडेच खेचलं गेलं. सलमान खान होस्ट करत असलेल्या बिग बॉस 19 कार्यक्रमात शेवटच्या आठवड्यात नवं काहीतरी पाहायला मिळणार आहे. या सीजनचा विनर कोण होतो? याकडे चाहत्यांचे लक्ष आहे.
तिकीट टू फिनालेच्या टास्कमध्ये नेमकं घडलं काय ?
बिग बॉस 19 मध्ये तिकीट टू फिनालेचे टास्क पार पडले. घरातील सर्व सदस्यांना असेंबली रूममध्ये बोलवण्यात आलं होतं. यात वाइल्ड कार्ड स्पर्धक मालती चाहर आणि शाहबाज यांना फिनालेच्या शर्यतीत राहायचं आहे की नाही असे विचारले त्यावेळी बाकी सगळ्यांनी आपापली मत मांडली. नंतर पुढील प्रक्रिया कुटुंबातील इतर सदस्यांना समजावून सांगण्यात आली.
जेव्हा घरातील सदस्यांसमोर तिकीट टू फिनालेची गोल्डनरंगातील पाटी आली त्यावेळी सगळेच स्पर्धक आनंदी झाले. नंतर बिग बॉसने मालती आणि शाहबाज यांना फिनालेच तिकीट मिळायला हवं की नाही याचा निर्णय घरातल्या स्पर्धकांवर सोपवला. यावर प्रत्येकाने आपापली मतं सांगितली.
Bigg Boss house mein shuru hone jaa rahi hai Ticket To Finale ki race, lekin kya Shehbaz aur Malti ko milega isey paane ka mauka? 🧐
— JioHotstar Reality (@HotstarReality) November 24, 2025
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @colorstv par.
Watch Now:- https://t.co/XNlwzrEgyf pic.twitter.com/5c3BWWekoA
तिकीट टू फिनालेचा टास्क काय होता?
बिग बॉसने गार्डन भागामध्ये फायर ओशन सेटअप तयार केला होता. यामध्ये दोन लाव्हा रेस ट्रॅक तयार करण्यात आले होते. स्पर्धकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा वेगवान शर्यत लावून ट्रॅक ओलांडावा लागणार होता.जेणेकरून ते तिकीट टू फिनालेच्या शर्यतीत टिकू शकतील. एका वेळी फक्त दोन स्पर्धक शर्यत करतील असा नियम होता. ही शर्यत सुरू असताना उर्वरित दोन सदस्यांना मदतनीस बनवण्यात आले होते. यात एकूण चार शर्यती ठेवण्यात आल्या होत्या. ज्या चार शर्यती पुढे असतील त्या जिंकतील व उरलेल्या चार शर्यती बाद होतील.
तिकीट टू फिनालेची पहिली दावेदार कोण?
अशनूर कौर ही बिग बॉस 19 तिकीट टू फिनालेची पहिली दावेदार ठरली. शर्यत सुरू झाली तेव्हा पहिल्या रेसमध्ये घोड्याचा आवाज आला आणि घरातील सर्व सदस्यांनी तागाच्या पिशव्या कोरड्या गवताने भरायला सुरुवात केली. हे त्यांना पहिला दहा मिनिटात करावं लागलं. त्याचवेळी दुसऱ्या आवाजावर थांबून बॅग उचलावी लागली. यानंतर दोन्ही पिशव्यांची वजनं मोजली जाणार होती. ज्या स्पर्धकाच्या पिशव्या जड होत्या, त्यांना मदतनीस दिले जात होते. पहिल्या फेरीत तिकीट टू फिनालेचा दावा करणाऱ्या स्पर्धकांमध्ये अशनूर कौरही पहिली सदस्य होती. तिची शर्यत तान्या मित्तलशी होती. या शर्यतीत गौरवने आपल्या मित्राला आधार देत त्याचा मदतनीस बनला होता.
दुसऱ्या फेरीत प्रणित मोरे आणि शाहबाज यांच्यात टास्क झाला. प्रणितचा मदतीनेच गौरव होता. व शाहबाजचा अशनूर. दुसऱ्या फेरीत प्रणित तिकीट टू फिनालेचा दावेदार ठरला व शहबाज एलिमिनेट झाला. तिसऱ्या फेरीत गौरव खन्ना आणि मालती शहर यांच्यात टास्क होते. अशनूरने गौरवला मदत केली आणि शहाबाजने मालतीला मदत केली. तिसऱ्या फेरीत गौरवने मालतीचा पराभव केला. चौथ्या फेरीत फरहाना आणि अमल मलिक यांच्यात टास्क झाला. आम्हाला शहाबाजने मदत केली तर गौरवने फरहाणाला मदत केली.फरहनाने बाजी मारली.
Tomorrow Promo: Shehbaaz Vs Farrhana. And later she broke the plate...😱 pic.twitter.com/8eW0cy0MzE
— BBTak (@BiggBoss_Tak) November 24, 2025
फरहाना आणि शहबाज यांचे भांडण
फरहाना आणि शहाबाज यांच्यात भांडी घासण्यावरून भांडण झालं. या आठवड्यात घरात कॅप्टन नसल्यामुळे फरहाना नेहमीप्रमाणे आपली ड्युटी पार पाडत नव्हती.त्यावेळी शहनाज गिलच्या भावाने तिला इशारा दिला " भांडी धुवा नाहीतर मी तुमच्या बेडवर घेऊन येईन" यावरून त्या दोघांमध्ये भांडण झालं. यात त्याने ताट फोडलं. त्यात ताटाचा तुकडा जवळच उभ्या असलेल्या तान्याला लागला. त्यामुळे तान्या रडली.























