Bigg Boss 19 Promo: फरहाना गार्डनमध्ये थुंकली, तर तान्या भडकली; कुनिकाचा मुलगा चकीत; म्हणाला, 'आता तर जेवण भरवत होती..'
गार्डनमध्ये तान्यासमोर थुंकल्यामुळे फरहानावर तान्या भडकलेली दिसते .त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो . या दोघींच्या भांडणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही फिरत आहेत .

Bigg Boss 19: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरणारा बिग बॉस 19 हा शो कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो . यामध्ये तान्या मित्तल ही स्पर्धक सुरुवातीपासूनच प्रसिद्धीझोतात राहिलीय . बिग बॉसच्या घरात सध्या 'फॅमिली वीक ' सुरू आहे . (Bigg Boss 19) दुसरीकडे घरात काही भावनिक प्रसंगही घडतात तर दुसरीकडे तापलेलं वातावरणही पाहायला मिळत आहे . बिग बॉसच्या घरात कोणता ना कोणत्या गोष्टीवरून भांडण सुरूच असतात .स्पर्धकांना भांडण्यासाठी कुठलाही मुद्दा पुरतो . बिग बॉसच्या घरातील तान्या मित्तलची (Tanya Mittal) एकमेव मैत्रीण समजली जाणारी फरहाना भट्ट (Farhana Bhatt) आणि तान्याच्या नात्याला तडा गेला आहे . घरात आता फरहान आणि तान्या मध्येच भांडण झाल्याने प्रेक्षकांनाही धक्का बसलाय . गार्डनमध्ये तान्यासमोर थुंकल्यामुळे फरहानावर तान्या भडकलेली दिसते . त्यांच्यामध्ये आयानही बोलताना दिसतो .दोन मिनिटांपूर्वी तुम्ही एकमेकांना हाताने जेवण भरवत होतात .
गार्डनमध्ये थुंकली, टोकताच तान्यावर भडकली
बिग बॉसच्या घरातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय . ज्यामध्ये फरहाना गार्डनमध्ये गार्डन एरियामध्ये थुंकते . ही बाब तान्याला अजिबात आवडत नाही .ती फरहानाला 'इथे थुंकू नकोस ' असे बजावते . यावरून फरहाना,'माझं डोकं फिरवू नकोस..' असं म्हणत फटकारते . तिथून निघून जाते .दुसरीकडे बसून ती मुद्दाम कुठलाही गोष्टीला Point out करते . 'आधी स्वतःला ठीक कर .. ' म्हणताच तिकडून तान्या 'नाही करणार ' असं उत्तर देते . तान्या तिला म्हणते, " तुला कोणीही घाबरत नाही .इथे असलेले सगळे काही तुझे गुलाम नाहीत " फरहाणालाही राग येतो, ती म्हणते" मुद्दामून असे मुद्दे काढते आणि नंतर सगळ्यांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न करते . ' दोघींचं हे भांडण बघून घरातले इतर स्पर्धकही चक्रावतात .शेवटी कुणी का चा मुलगा आयान त्या दोघींमध्ये हस्तक्षेप करतो आणि त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो . या दोघींच्या भांडणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही फिरत आहेत .
याच्यावरही त्या दोघेही गप्प बसत नाहीत . फरहाणा बोलते, इथे सगळे आपली इमेज चांगली दाखवण्यामध्ये गुंगले आहेत ' मी कशी संस्कारी आहे ' .. यावर तान्याही म्हणते कितीला फरक पडत नाही .कोणीही तुला घाबरत नाही .कोणी तुझा गुलाम नाही " या दोघींचं भांडण झाल्यानंतर आयान मध्ये पडतो . ' आत्ता दोन मिनिटांसाठी तुम्ही एकमेकांना आपल्या हाताने घास भरवत होतात " असं आयान म्हणतो .या सगळ्या वादावादीमध्ये आकांक्षाची एन्ट्री होते . ती आल्यानंतर गौरवला मिठी मारते .त्या दोघांना सोबत पाहून अमल म्हणतो ' मी माझे डोळे बंद केले आहेत ' .. सध्या चाहते या व्हिडिओवर प्रतिक्रिया करताना दिसत आहेत .
Ghar mein tension badh gayi jab Farrhana ne Tanya ke saamne spit kiya. Kya yeh fight unki dosti mein daraar layega? 🙄
— JioHotstar Reality (@HotstarReality) November 17, 2025
Dekhiye #BiggBoss19 ka naya episode, har roz raat 9 baje #JioHotstar par aur 10:30 baje @ColorsTV par.
Watch Now:- https://t.co/XNlwzrEgyf pic.twitter.com/ehLbMVuu1b
चाहत्यांची रिएक्शन काय ?
बिग बॉसच्या प्रोमोमधील व्हिडिओमध्ये तान्या आणि फरहाना च्या भांडणावर चाहते प्रतिक्रिया देत आहेत . एक म्हणतो यांना फॅमिली वीकमध्ये ही शांत राहता येत नाही .काहींनी तान्याचं म्हणणं बरोबर असल्याचं सांगत लिहिलं, " तान्याने तिला बरोबर सुनावलं . हे तिचे मॅनर्स आहेत का ? लोक बसले आहेत समोर आणि ती थुंकत आहे . जर ही बिग बॉस ची विनर ठरणार असेल तर बिग बॉसचा हा सर्वात लो रेकॉर्ड असेल .गालिबाज, भूकबाज, फटकळ . . "
























