Bharti Singh Haarsh Limbachiyaa Welcomes Baby Boy: 41व्या वर्षांची भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई; लिंबाचिया कुटुंबात चिमुकल्या पावलांनी गोड पाहुण्याचं आगमन
Bharti Singh Haarsh Limbachiyaa Welcomes Baby Boy: कॉमेडीयन भारती सिंह आणि लेखक-निर्माता हर्ष लिंबाचिया यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्यांंच आगमन झालंय.

Bharti Singh Haarsh Limbachiyaa Welcomes Baby Boy: सुप्रसिद्ध कॉमेडीयन भारती सिंह (Bharti Singh) आणि लेखक-निर्माता हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) यांनी शुक्रवारी, 19 डिसेंबर रोजी त्यांच्या दुसऱ्या बाळाचं स्वागत केलं. मीडिया रिपोर्टनुसार, भारती शूटमध्ये असतानाच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या, त्यामुळे तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. भारती सिंहनं गोंडस मुलाला जन्म दिल्याची माहिती मिळतेय. भारती सिंहला आधीपासूनच एक मुलगा आहे. त्याला प्रेमानं सर्वजण गोला म्हणून ओळखतात. चाहत्यांचा लाडका गोला आता मोठा दादा झालाय. चाहत्यांकडून हर्ष आणि भारतीच्या फोटोंवर कमेंट करुन शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आज सकाळपासूनच भारती सिंह शूटमध्ये बिझी होती. त्याचवेळी तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्यानंतर सेटवरच्यांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. भारतीनं गोंडस मुलाला जन्म दिला आहे. भारतीला रुग्णालयात दाखल केलं, त्यावेळी तिचा पती आणि लेखक-निर्माता हर्ष लिंबाचिया तिच्यासोबत रुग्णालयात होता. भारती आणि हर्षनं आपल्या दुसऱ्या मुलाचं स्वागत केल्याचं बोललं जात आहे.
View this post on Instagram
वयाच्या 41व्या वर्षी भारतीनं दिला दुसऱ्या बाळाला जन्म (Bharti Singh Welcomes Baby Boy)
कॉमेडीयन भारती सिंहनं वयाच्या 41व्या वर्षी आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला आहे. भारती सिंहनं 2017 मध्ये हर्ष लिंबाचियाशी लग्न केलं. 2022 मध्ये, या जोडप्यानं त्यांचा मुलगा लक्ष्य, ज्याला ते प्रेमाने गोला म्हणतात, त्याचं स्वागत केलेलं. ऑक्टोबरमध्ये, या जोडप्यानं एका पोस्टद्वारे त्यांच्या दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केलेली. तेव्हापासूनच भारती आणि हर्ष यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होत होता. अशातच भारतीनं तिच्या प्रेग्नंसी शूटचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेले.
दरम्यान, प्रेग्नंसी अनाउंस करताना एक रोमँटिक फोटो शेअर केलेला. ज्यामध्ये भारती सिंहनं आपला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसलेली. याव्यतिरिक्त वेबी शॉवर आणि मॅटरनिटी फोटोशूटचे फोटोही जोडप्यानं शेअर केलेले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























