एक्स्प्लोर

Bharti Singh : हॉस्पिटलमधून घरी पोहोचल्यानंतर भारती सिंहच्या बाळाचं ‘असं’ झालं स्वागत! पाहा व्हिडीओ....

Bharti Singh : नुकतेच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे आई-वडील झाले आहेत. त्यांच्या मुलाचा जन्म 3 एप्रिल रोजी झाला.

Bharti Singh : प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली भारती सिंह अनेकदा तिचा यूट्यूब ब्लॉग शेअर करते, ज्याद्वारे ती चाहत्यांना तिच्या दैनंदिन जीवनाची माहिती देत असते. आता तिने त्या खास दिवसाची झलक चाहत्यांना दाखवली आहे, जेव्हा ती तिच्या नवजात बाळाला घेऊन रुग्णालयातून घरी पोहोचली होती.

भारती सिंहने नुकतीच हॉस्पिटलच्या शेवटच्या दिवसाची आणि तिच्या बाळाच्या घरी केलेल्या स्वागताची झलक चाहत्यांना दाखवली आहे. आधी ती हॉस्पिटलच्या रूममधून व्हिडीओ बनवते. त्यात ती सर्व डॉक्टरांचे आभार मानते. यानंतर हर्ष आणि भारती बाळाला घेऊन तिथून निघतात. व्हिडीओमध्ये भारती कारच्या फ्रंट सीटवर बसली आहे, तर तिचा पती हर्ष त्यांच्या मुलासोबत मागे बसलेला दिसला. भारतीने सांगितले की, तिने आणि हर्षने मिळून त्यांच्या मुलाचे नाव 'गोला' ठेवले आहे.

व्हिडीओच्या शेवटी तिने बाळाच्या स्वागतासाठी आपले घर किती सुंदर सजवले होते, ते दाखवले आहे. बाळाच्या स्वागतासाठी भारतीचं घर निळ्या आणि पांढऱ्या फुग्यांनी सजवलेलं होतं. बाळासाठी सर्वत्र तारे आणि फुगे लावण्यात आले होते. भारती आत प्रवेश करताच, तिची आणि तिच्या बाळाची नजर काढली गेली, त्यानंतर ती तिच्या मुलाला आत खोलीत घेऊन गेली. ही खोली देखील  बाळाच्या आगमनासाठी अतिशय गोंडस पद्धतीने सजवली गेली होती.

नुकतेच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया हे आई-वडील झाले आहेत. त्यांच्या मुलाचा जन्म 3 एप्रिल रोजी झाला. भारती सिंहने सोशल मीडियावर एका खास पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तीच पोस्ट शेअर करत भारती आणि हर्षने लिहिले, 'इट्स अ बॉय'.  भारती तिच्या गरोदरपणाच्या अगदी शेवटच्या दिवसापर्यंत शूटिंग करत होती. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Jayanti 2 Marathi Movie: 'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
'जयंती' नंतर आता येतोय 'जयंती 2'; सीक्वेलमध्ये नवा चेहरा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची एन्ट्री
Nauheed Cyrusi on Miscarriages: 'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
'मौला मेरे मौला' फेम अभिनेत्री का आई होऊ शकली नाही? म्हणाली, 2 वेळा गर्भपात; तिसऱ्या महिन्यांतच बाळाच्या हृदयाचे ठोके....
Amol Kolhe On Savitribai Jyotiba Phule Serial: TV वरुन गाशा गुंडाळला, पण युट्यूबर येताच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं; 'सावित्रीबाई जोतीराव फुले'बाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
'टीआरपीपेक्षा प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं...'; 'सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा निर्णय
Devoleena Bhattacharjee: पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं
पुराच्या पाण्यात अडकली आई, आजी-मावशीचं घर बुडालं; निसर्गाचा विध्वंस पाहून प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला रडू कोसळलं

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Embed widget