एक्स्प्लोर

मराठमोळ्या अभिनेत्रीच्या आईचं निधन; दोन महिन्यांपूर्वीच लेकीचं लग्न, आनंद सांगत पोस्टद्वारे दु:ख व्यक्त

Bhagyashree Nhalve Mourns Mothers Death: अभिनेत्री भाग्यश्री न्हालवेचं लग्न डिसेंबर 2025 मध्ये झालं होतं. लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांत तिच्या आईचं निधन झालं.

Bhagyashree Nhalve mother death after marriage: 2025 साली अनेक जण लग्नाच्या बेडीत अडकले होते. काही सेलिब्रिटींच्या घरातही सनईचे सूर घुमले. डिसेंबर महिन्यात अभिनेत्री  भाग्यश्री न्हालवे हिचा विवाह झाला होता.  2 डिसेंबर 2025 रोजी ती लग्नाच्या बेडीत अडकली होती.  आईच्या पसंतीच्या मुलाशी तिनं  विवाह केला होता. तिच्या लग्नातील अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. दरम्यान, सुखी संसार सुरू असतानाच तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  लग्नाच्या अवघ्या  2 महिन्यांनंतर तिच्या आईचं निधन झालं.  भाग्यश्रीची आई गेल्या काही महिन्यांपासून  एका गंभीर आजाराशी झुंज देत होती. भाग्यश्रीच्या माऊलीची ती झुंज अपयशी ठरली.  त्यांची प्राणज्योच मालवली.  आईच्या निधनानंतर भाग्यश्रीने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्रीच्या आईला  ऑटो इम्युन नावाचा गंभीर आजार झाला होता. याच आजारामुळे भाग्यश्रीच्या आईचे निधन झाले.  तिनं आईच्या निधनानंतर आपले दु:ख पोस्टद्वारे व्यक्त केले.  तिनं पोस्टमध्ये लिहिलं की, "आई.. लग्नाला माझ्या आज दोन वर्ष पूर्ण झाले आहेत.  या दोन वर्षात मला एकही फोन केला नाही.  सासरी गेलेल्या मुलीला आईने सारखं फोन करू नये, यासाठी आईनं फोन करणं टाळलं. आईचा फोन सारखा आला तर, मुलीचं संसारात लक्ष लागत नाही. अशा मताची माझी आई होती. लग्नानंतर एकही फोन न करता माझी आई देवाघरी गेली".

"लग्नाला माझ्या दोन महिनेही झाले नाही.  तू मला सोडून गेलीस. मला शेवटपर्यंत तुझ्याजवळ राहायचं होतं. मला लग्न करायचं नव्हतं.  तेव्हा तू म्हणाली होतीस की,  राणा तू माझ्यासाठी लग्न कर. माझं काही पण होवो. पण तू मागे वळून पाहायचं नाही. तू आता तुझा विचार कर, माझ्यासाठी इतकं कर..खूप ठाम निर्णय होता तिचा.. एका भेटीत तिनं मला लग्नाचा निर्णय घेण्यास भाग पाडलं. केवळ आई सांगते, म्हणून तिच्या इच्छेसाठी मी लग्न करण्यास तयार झाले. आज तू गेल्यावर मला कळलं, माझ्यासाठी तू निवडलेला मुलगा  किती योग्य आहे", असं म्हणत भाग्यश्रीनं भावना व्यक्त केल्या.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhagyashree Nh🇮🇳 (@bhagyashreenh)

"माझा संसार पाहण्यासाठी तू आज हवी होतीस.  माझ्या नारायणाला आता कोण नमस्कार करणार?  मला तू असं सोडून का गेलीस?  तुला सगळं ठाऊक होतं, म्हणून तू माझी योग्य सोय करून गेलीस. आईला लेकराचं चांगलंच कळतं. आई, तू सांगितल्याप्रमाणे मी मागे वळून पाहणार नाही.  हे माझं तुला वचन आहे", असं भाग्यश्रीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
Sushant Singh Saurav Ganguly: राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
राजकुमार ऐवजी सुशांत सिंह राजपुतला 'दादा'मध्ये साकारायचा होता रोल, पण निधनामुळे इच्छा अपूर्णच
Toxic Film yash and kiara: रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
रोमान्स, लिपलॉक अन् भरपावसात.., 'टॉक्सिक'चं 'तबाही' गाणं रिलीज, यश-कियाराची केमिस्ट्री पाहून प्रेक्षकांना फुटला घाम
Drishyam fame Actor Financial Loss: 'दृश्यम'मधला खतरनाक गायतोंडे आठवतोय?अभिनेत्याला 'या' चुकीमुळे बसलाय 70 लाखांचा फटका! म्हणाले ..
'दृश्यम'मधला खतरनाक गायतोंडे आठवतोय?अभिनेत्याला 'या' चुकीमुळे बसलाय 70 लाखांचा फटका! म्हणाले ..

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
शरद पवार प्रदीर्घ कालावधीनंतर विधानभवनात पोहोचले, उपमुख्यमंत्री शिंदे कॅबिनेट सोडून थेट भेटीला
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
'इराणसोबत हंगामी युद्धबंदी संपली..' एकाचवेळी शक्तीशाली 80 हल्ल्यानंतर ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगाला पुन्हा धडकी भरली, इराणच्या तेल विक्रीला परवानगी देणारा परवाना सुद्धा रद्द
US Iran War : अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, भारतात शेअर मार्केट क्रॅश, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर भडकले, पुन्हा युद्धाचं संकट 
अमेरिकेचा इराणवर क्षेपणास्त्र हल्ला, क्रूड ऑईलच्या दरात पुन्हा वाढ सुरु, जगावर युद्धाचं पुन्हा संकट?
Building collapses in Moshi Pimpri Chinchwad: पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
पिंपरी चिंचवडच्या मोशीत इमारत कोसळली, चौदा-पंधरा जण अडकल्याची भीती
Share Market Crash :  डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
डोनाल्ड ट्रम्प यांनी एक घोषणा करताच भारतीय शेअर बाजार क्रॅश, गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटी बुडाले
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
शरद पवार अनेक वर्षांनी विधानभवनात, स्वागताला दिग्गज नेते; मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, नारायण राणेही उपस्थित
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
नगरसेवकाने डॉक्टरांवर हात का उचलला? आईने सांगितली आपबिती, भरपावसात गरोदर मुलीस दाखल करुन घेण्यास नकार
Embed widget