Betty White : प्रसिद्ध अभिनेत्री बेट्टी व्हाइट (Betty White) यांचे  शुक्रवारी (31 डिसेंबर) निधन झाले. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन आठवड्यानंतर बेट्टी व्हाइट या 100 वर्षांच्या होणार होत्या. बेट्टी यांना 'गोल्डन गर्ल्स' या शोमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. त्यांना 8 अॅमी पुरस्कार, 1 ग्रॅमी पुरस्कार आणि 3 स्क्रिन अॅक्टर्स गिल्ड पुरस्काराने गौरवण्यात आले होते. बेट्टी व्हाइट यांनी 1949 मध्ये छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (joe biden) यांनी ट्वीट करत लिहिले, 'अमेरिकेतील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे काम अभिनेत्री बेट्टी व्हाइट यांनी केले. त्या प्रेक्षकांच्या नेहमी लक्षात राहतील.'‘द मेरी टायलर मूर शो’ या प्रसिद्ध शोमध्ये देखील बेट्टी व्हाइट यांनी काम केले होते. 






बेट्टी व्हाइट यांच्या पतीचे म्हणजेच  एलेन लुडेन यांचे 1981 साली निधन झाले. जेफ विटजास यांनी पीपल मॅगजीनला सांगितले होते की,बेट्टी व्हाइट या मृत्यूला घाबरत नव्हत्या. त्यांना नेहमी त्यांच्या पतीची आठवण येत होती. 


संबंधित बातम्या


Malaika Arora Arjun Kapoor Love : 12 वर्षांनी मोठ्या मलायकासोबतच्या रिलेशनशिपमुळे अर्जुन ट्रोल, ट्रोलर्सनाला दिलं सडेतोड उत्तर


Taarak Mehta ka Ooltah Chashmah show : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेबद्दल पसरलेल्या 'या' अफवा माहितेय?


सलमान ते शिल्पा ; बॉलिवूडमधील हे कलाकार करतात छोट्या पडद्यावरून मोठी कमाई


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha