Welcome 2022 : नव्या वर्षात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. 1 जानेवारी 2022 पासून तुमच्या आयुष्यात होणाऱ्या बदलांची सर्व माहिती अगोदरच घ्या आणि त्यासाठी सज्ज व्हा.


कपडे आणि चप्पल खरेदीवर अधिक जीएसटी
नव्या वर्षात चप्पल खरेदी महागणार आहे. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 46 व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी वाढीच्या सध्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. यापूर्वीच्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटीत 5 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, देशभरातील कपडा व्यापार्‍यांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केल्यामुळे ही स्थगिती देण्यात आली आहे. ही जीएसटी दरवाढ फेब्रुवारी 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वर्षात चप्पल आणि बुटांच्या किमती वाढणार आहेत.


1 जानेवारीपासून तुम्ही रेल्वेत आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार
भारतीय रेल्वे 1 जानेवारीपासून मोठा बदल करणार आहे. तुम्ही आरक्षणाशिवायही ट्रेनमध्ये प्रवास करू शकाल. 1 जानेवारी 2021 पासून रेल्वे 20 सामान्य डब्यांवर अनारक्षित तिकिटांतून प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार ​​आहे. नवीन वर्षात तुम्ही अनारक्षित तिकिटावर प्रवास करू शकाल.


एटीएममधून पैसे काढणे महागणार
नवीन वर्षापासून लागू होणार्‍या नव्या नियमानुसार, एटीएममधील मोफत मर्यादेपेक्षा आर्थिक व्यवहारावर 21 रुपये शुल्क आकारले जाईल, ज्यामध्ये करांचा समावेश नाही. हे शुल्क 31 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 पर्यंत 20 रुपये होते. मात्र आता तुम्हांला तुम्हाला मोफत मर्यादेपेक्षा जास्त रोख व्यवहारांसाठी 20 ऐवजी 21 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे. जर तुम्ही मोफत व्यवहारापेक्षा जास्त पैसे काढले तर तुम्हांला प्रत्येत व्यवहार 20 ऐवजी 21 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय ग्राहकांना त्यावर जीएसटीही भरावा लागणार आहे.


इंटरचेंज व्यवहार शुल्कात वाढ
आणखी एक महत्त्वाचा बदल म्हणजे बँकांना प्रति व्यवहार अदलाबदल शुल्क वाढवण्याची परवानगीही देण्यात आली आहे. आर्थिक व्यवहारांसाठी हे शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये करण्यात आले आहे. गैर-आर्थिक व्यवहारांसाठी इंटरचेंज फी 5 रुपयांवरून 6 रुपये करण्यात आली आहे.


इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी शुल्क
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये, तुम्ही बचत आणि चालू खात्यांमध्ये कोणतेही शुल्क न आकारता एका महिन्यात फक्त 10,000 रुपये जमा करू शकता. आयपीपीबीने माहिती दिली आहे की 10,000 च्या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम जमा करण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत तीन प्रकारची बचत खाती उघडली जातात, ज्यामध्ये मूलभूत बचत खाते आणि बचत खाते यासाठी वेगवेगळे नियम आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने माहिती दिली आहे की नवीन शुल्क 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील आणि बँकिंगच्या इतर नियमांनुसार त्यांच्यावर GST/सेस लावला जाईल.


केवायसी न केलेले डीमॅट खाते 1 जानेवारीपासून निष्क्रिय केले जाईल
जर तुम्ही31 डिसेंबरपर्यंत तुमच्या डिमॅट खात्याचे KYC पूर्ण केले नसेल, तर तुमचे खाते 1 जानेवारीपासून निष्क्रिय केले जाईल. 


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha