WHO Chief on COVID19 : जगभरात लोक नव्या वर्षाच्या स्वागत करण्यात दंग आहेत मात्र, कोरोनाचं (Coronavirus) संकट अद्यापही कायम आहे. दुसरीकडे ओमायक्रॉन व्हेरियंटनेही (Omicron Variant) 24 देशांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केलीय. अशात आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. 2022 या नव्या वर्षात कोरोना महामारी संपेल असं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे की, जगातील सर्व देशाच्या सरकारने कोरोना महामारी संपवण्यासाठी मिळून काम केले पाहिजे.


जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अ‍ॅडनोम गेब्रेयसस यांनी म्हटलं आहे की, ''2022 वर्षात आपण सर्वांनी मिळून कोरोनावर मात करुया. यासाठी सर्व देशांनी एकत्र मिळून काम करायला हवं.  येत्या वर्षभरात महामारी संपवायची असेल तर विषमता संपवावी लागेल. यासाठी आपल्याला प्रत्येक देशामध्ये किमान 70 टक्के जनतेचं जून 2022पर्यंत लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.'' यावेळी त्यांनी आपत्कालीन वापरासाठी नव्याने मंजुरी मिळालेल्या नोवाव्हॅक्स लसीच्या वापराबाबतचे निर्देश जारी केले आहे. नोवाव्हॅक्स ही लस सीरम इन्सिस्ट्यूट ऑफ इंडिया कंपनी निर्मित आहे. जगभरातील कोरोना लसीकरणात नवी लस मदत करेल असंही यावेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटले आहे.


गेब्रेयसस यांनी सांगितले की, 2021 वर्षात कोरोनामुळे 33 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. एचआयव्ही, मलेरिया आणि क्षयरोगामुळे झालेल्या एकूण मृत्यूंपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. सध्याही दर आठवड्याला सुमारे 50 हजार लोकांचा मृत्यू होत आहे. याशिवाय अनेकांच्या मृत्यूची नोंद नाही.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha