Malaika Arora Arjun Kapoor : बॉलिवूडमधील नेहमी चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेत्री मलायाका आरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor). दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. त्यांच्यामधील वयातील अंतरामुळे त्यांना अनेकवेळा ट्रोल केले जाते. एका मुलाखतीमध्ये अर्जुननं ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं.
मुलाखतीत अर्जुनने सांगितले, 'जेव्हा तुम्ही रिलेशनमध्ये असता तेव्हा वयातील अंतराचा विचार करू नये. आपण अशा समाजात राहतोय जो वेळेनुसार प्रोग्रेसिव्ह होत नाहिये. '
मलायका आणि अर्जुनच्या लग्नाबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अर्जुनने सांगितले होते, 'माझा लग्न करण्याचा निर्णय मी कधीच लपवणार नाही. पण लग्नाबद्दल अजून तरी काही विचार केला नाही आणि केला तरी तो सर्वांना सांगेन, लपवणार नाही.'
मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांनी लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. 1998 साली अरबाज आणि मलायकाचे लग्न झाले. त्यानंतर 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. त्या दोघांना अरहान नावाचा मुलगा आहे.
संबंधित बातम्या
Pawankhind Movie : दिग्पाल लांजेकरांच्या 'पावनखिंड' सिनेमात चिन्मय मांडलेकर छत्रपतींच्या भूमिकेत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha