Rumours about Taarak Mehta ka Ooltah Chashmah show : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 13 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेबद्दल अनेक अफवा सोशल मीडियावर पसरत असतात. जाणून घेऊयात या अफवांबद्दल... 


मुनमुन दत्ता आणि  राज अनादकट यांचे अफेअर 
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबीता जी ही भूमिका साकरणारी अभिनेत्री  मुनमुन दत्ताचे नाव टप्पू ही भूमिका साकारणारा राज अनादकटसोबत जोडले गेले. त्या दोघांच्या नात्याबद्दल सोशळ मीडियावर चर्चा झाली. असं म्हणलं जात होत की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. पण ही केवळ अफवा आहे. मुनमुनने देखील सोशल मीडियावर याबाबत पोस्ट शेअर केली होती. 


दिलीप जोशी मालिका सोडणार
काही दिवसांपूर्वी अशी चर्चा सुरू होती की, जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी हे तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडणार आहेत. याबद्दल एका मुलाखतीमध्ये दिलीप यांना प्रश्न विचारण्यात आला मुलाखतीमध्ये दिलीप यांनी सांगितले, 'मी ही मालिका सोडत नाहिये. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत असताना मी ही मालिका विनाकारण का सोडू? या शोमुळे मला प्रेक्षकांचे प्रेम मिळाले.'


दिलीप जोशी आणि शैलेश लोढा यांचं भांडण 
सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू होती की जेठालाल ही भूमिका साकरणारे दिलीप जोशी आणि तारक मेहता ही भूमिका साकरणारे शैलेश लोढा हे दोघे एकमेकांसोबत बोलत नाहित. तसेच त्यांच्यात भांडण सुरू आहे असंही म्हटलं जात होत. पण ही अफवा असल्याचं दिलीप जोशी यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.  


हे ही वाचा


Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सोडणार जेठालाल? दिलीप जोशी म्हणाले...


सलमान ते शिल्पा ; बॉलिवूडमधील हे कलाकार करतात छोट्या पडद्यावरून मोठी कमाई


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha