Bollywood Stars Reality Show Income : बॉलिवूडमधील (bollywood) अनेक कलाकार छोट्या पडद्यावरील शोमध्ये काम करतात. चित्रपटांसाठी कोट्यवधींचे मानधन घेणारे कलाकार छोट्या पडद्यावर काम करण्यासाठी किती मानधन घेतात? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडत असेल. जाणून घेऊयात बॉलिवूड कलाकार एका शोचे किती मानधन घेतात....
सलमान खान (salman khan)
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉसचे सूत्रसंचालन करतो. या शोच्या 11 सिझनचे सूत्रसंचालन सलमाननं केलं आहे. रिपोर्टनुसार या शोच्या एका एपिसोडसाठी सलमान 13 कोची रूपये मानधन घेतो. म्हणजेच या पूर्ण शोमधून सलमान 200 कोटी कमावतो.
माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)
झलक दिखला जा या शोचे परीक्षण अभिनेत्री माधुरी दीक्षित करत होती. या शोच्या एका एपिसोडचे 1 कोटी मानधन माधुरी घेत होती.
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक शोमध्ये सहभाग घेतला आहे. तिनंनच बलिए, जरा नचके दिखा, सुपर डान्सर यांसारख्या शोचे परीक्षण केले आहे. रिपोर्टनुसार सुपर डान्सर या शोसाठी शिल्पा 14 कोटी मानधन घेते.
करीना कपूर खान (kareena kapoor)
करीना कपूर खान डान्स इंडिया डान्स: बॅटल ऑफ द चँपियन्स या शोचं परीक्षण करत होती. ती या शोच्या एका एपिसोडसाठी 3 कोटी मानधन घेत होती.
हृतिक रोशन (Hrithik Roshan)
आपल्या डान्सने आणि हटके स्टाईलने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता ह्रतिक रोशन 'जस्ट डान्स' या शोचे परीक्षण करत होता. या शोच्या एका एपिसोडसाठी 2 कोटी रूपये मानधन घेत होता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Anushka Sharma Comeback : अनुष्का शर्मा बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन करणार; अधिकृत घोषणा लवकरच
फॅमिली मॅन ते बॉम्बे बेगम्स; 2021 मध्ये या वेब सीरिज होत्या चर्चेत
म्हणून चाहत्यावर भडकली रुबिना दिलैक; शेअर केली पोस्ट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha