Khaas Re Tv Song Bekkar Thandi : 'खास रे' च्या 'बेक्कार थंडी' ची हवा; थंडीचं भन्नाट अँथम सॉंग प्रेक्षकांच्या भेटीस
Khaas Re Tv Song Bekkar Thandi : खास रे टिव्हीचं 'बेक्कार थंडी' हे गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे.
Khaas Re Tv Song Bekkar Thandi : खास रे संगीत आणि लेट्सअप मराठीच्या संयुक्त विद्यमाने बोचऱ्या थंडीत महाराष्ट्रातील प्रेक्षकांना याड लावण्यासाठी 'बेक्कार थंडी' हे खास विंटर अँथम सॉंग लाँच करण्यात आलंय. या अँथम सॉंगची प्रदर्शित होताच अवघ्या महाराष्ट्रात 'हवा' झाली असून खास रे च्या यंग ब्रिगेडने पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केलं आहे.
नेहमीच आपल्या वेगळ्या प्रयोगांसाठी प्रसिद्ध असण्याऱ्या 'खास रे' च्या शिलेदारांनी यंदाही आपला गावरान बाज जपला असून थंडीचं हे धमाल गाणं प्रेक्षकांसमोर आणलंय. संतोष शिंदे याने या गाण्याचं दिग्दर्शन केलंय. तर संजय श्रीधर याने हे गाणं लिहिलं असून त्यानेच गायलं आहे. संदेश कालेकरनं हे गाणं संगीतबद्ध केलंय.
पुण्यातील बोपगावमध्ये एका रात्रीत बोचणाऱ्या थंडीत या गाण्याचं शूट पूर्ण करण्यात आलंय. विशेष म्हणजे गावातील ग्रामस्थांना या थंडीच्या अँथम सॉंगमध्ये अभिनय करण्याची संधी देण्यात आलीये.
नरेंद्रकुमार फिरोदीया यांनी ह्या गाण्याची निर्मिती केली असून चालू घडामोडींवर मनोरंजनात्मक पद्धतीने भाष्य करण्याचं प्रयत्न 'खास रे'च्या माध्यमातून आपण सातत्याने करत असल्याचं त्यांनी म्हंटलये. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पारा घसरलाय, विशेष म्हणजे यंदा मुंबईमधेही प्रचंड थंडी आहे. त्यामुळेच थंडीवरील हे अँथम सॉंग करण्याचं ठरल्याचं नरेंद्र कुमार फिरोदिया यांनी सांगितलं.
'लस घ्या', 'बाप पांडुरंग', 'उसाचा रस' ह्या खास रे च्या गाण्यांनी सगळ्यांचंच लक्षं वेधलं होतं, त्यामुळे आता हे गाणं ही प्रेक्षकांना भुरळ घालेल यात शंका नाही.
संबंधित बातम्या
Honeymoon Movie : जास्मिन भसीन आणि गिप्पी ग्रेवालच्या 'हनीमून' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात
Happy Birthday Vamika : विराट -अनुष्काच्या लाडक्या लेकीचा पहिला वाढदिवस, चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha