एक्स्प्लोर

Bappi Lahiri : संगीतातील 'गोल्डमॅन' बप्पीदांचे राजकारणाशी मात्र सूर जुळलेच नाहीत!

Bappi Lahiri Passed Away : ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांनी राजकारणातही नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता.

Bappi Lahiri Passed Away : जवळपास पाच-सहा दशके चित्रपटसृष्टीमध्ये हटके संगीत शैलीने बप्पी लाहिरी यांनी आपली छाप सोडली होती. प्रेक्षकांची मने जिंकलेल्या बप्पी लाहिरी यांनी राजकारणातही नवी इनिंग खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांची ही राजकीय कारकिर्द अतिशय अल्पजीवी ठरली. काही वर्षातच त्यांनी सक्रिय राजकारणातून माघार घेतली. बप्पी लाहिरी यांनी 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. 

बप्पी लाहिरी यांनी 2014 मध्ये तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला होता. बप्पी लाहिरी यांनी पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. युपीए-2 विरोधात असलेली नाराजी, मोदी लाट आणि त्याच्या जोडीला बप्पी लाहिरी यांची लोकप्रियता यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ते विजयी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, बप्पी लाहिरी यानी निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी त्यांचा पराभव केला. बप्पी लाहिरी हे तिसऱ्या स्थानावर होते. कल्याण बॅनर्जी यांना 5 लाख 14 हजार 933 मते मिळाली. तर बप्पी लाहिरी यांना 2 लाख 87 हजार 712 मते मिळाली. दुसऱ्या स्थानावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीर्थकार रॉय होते. त्यांना 3 लाख 62 हजार 407 मते मिळाली. 

या निवडणुकीनंतर बप्पी लाहिरी यांनी राजकीय क्षेत्रात फार सक्रियता दाखवली नाही. पश्चिम बंगाल भाजपच्या समितीमधून 2017 मध्ये बप्पी लाहिरी यांना वगळण्यात आले होते. आपण राजकारणात राजनाथ सिंह आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळे उतरलो होतो. या दोघांबद्दल मनात आदर असल्याचे बप्पी यांनी त्यावेळी सांगितले होते. राजकारणाला वेळ देता नसल्याने आपली प्राथमिकता सध्या चित्रपट असल्याचे बप्पी यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सAkshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया
Akshay Shinde Encounter: निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
निवडणुकीत हिरो बनण्यासाठी 'देवाभाऊचा न्याय'; हिरोगिरीच्या स्पर्धेतून अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; विजय वडेट्टीवारांचं टीकास्त्र
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
Embed widget