एक्स्प्लोर

Bangladesh Protest : जमावाने चित्रपट निर्माता आणि अभिनेत्याला बेदम मारहाणीत संपवलं, बांगलादेशातील घटनेने खळबळ

Bangladesh Protest : बांगलादेशी चित्रपट निर्माते सलीम खान आणि त्यांचा मुलगा शांतो खान यांची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे.

Bangladesh Protest :  बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराची (Bangladesh Violence) झळ हजारो निष्पापांना सहन करावी लागली आहे. राजकीय उलथापालथीत जमावाकडून हल्ले, हत्यांचे प्रकार सुरू आहेत. हिंसाचाराच्या आगीत पेटलेल्या बांगलादेशातून  आणखी एक घटना समोर आली आहे. बांगलादेशी चित्रपट निर्माते सलीम खान (Selim Khan) आणि त्यांचा मुलगा शांतो खान (Shanto Khan) यांची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. निर्माता असण्यासोबतच सलीम खान बांगलादेशातील चांदपूर उपजिल्हामधील लक्ष्मीपूर मॉडेल युनियन परिषदेचे अध्यक्षही होते.

एका वृत्तानुसार, सोमवारी 5 ऑगस्ट रोजी सलीम आणि शांतो घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर बलिया युनियन, फरक्काबाद मार्केटमध्ये संतप्त जमाव त्यांच्यासमोर आला. स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने पिस्तुलातून गोळ्याही झाडल्या, पण जवळच्या बागरा मार्केटमध्ये त्यांना पुन्हा जमावाचा सामना करावा लागला. संतप्त जमावाने सलीम आणि त्याचा मुलगा शांतो यांना बेदम मारहाण करत त्यांची हत्या केली. 

भारतीय बंगाली चित्रपटसृष्टीसोबत संबंध

सलीम खान हे भारतातील बंगाली फिल्म इंडस्ट्री टॉलिवूडशीही संबंधित होते. टॉलिवूडमधील बड्या फिल्मस्टारपैकी एका अभिनेत्यासोबत त्यांनी 'कमांडो' या चित्रपटाची निर्मिती केली होती. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही. 

'टाईम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, टॉलीवूडमध्ये सलीमचे सुमारे 10 चित्रपट निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्प्यात होते आणि त्यात टॉलिवूडचे मोठे स्टार काम करत होते. टॉलिवूडशी संबंधित कार्यकारी निर्माता अरिंदम यांनी सोमवारीच सलीम यांच्याशी चर्चा केली होती. बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांच्या जीवनावर आधारित 'तुंगीपरर मिया भाई' (Tungiparar Miya Bhai) हा बांगलादेशी चित्रपट सलीमने दिग्दर्शित केला होता.

सलीम यांच्याविरोधात सुरू होता भ्रष्टाचाराचा खटला

चांदपूर नौदल हद्दीजवळील पद्मा-मेघना नदीतून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननात गुंतल्याचा आरोप सलीमवर होता. या अवैध धंद्यातून त्याने बक्कळ कमाई केली असल्याचा आरोप केला जात होता. या आरोपात  त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक आयोगात (एसीसी) खटलाही सुरू आहे.

चंदपूर सदर मॉडेल पोलिसांचे प्रभारी अधिकारी मोहम्मद शेख मोहसीन आलम यांनी सांगितले की, 'आम्हाला दोघांच्या मृत्यूची माहिती मिळाली, परंतु कोणीही आम्हाला माहिती दिली नाही. आमच्या सुरक्षिततेचा विचार करून आम्ही तिकडे गेलो नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगेLaxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडेDhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget