एक्स्प्लोर
दोन दिवसात 'बाला' चित्रपटाने कमवले इतके कोटी
'बाला' चित्रपटामध्ये आयुष्यमान खुराणा, यामी गौतम आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. 'बाला' चित्रपटाचा एकूण बजेट 25 कोटी होता. हा बजेट दोनच दिवसांत चित्रपटाने वसूल केला आहे.
![दोन दिवसात 'बाला' चित्रपटाने कमवले इतके कोटी bala box office day 2 collection ayushmann khurrana yami gautam bhumi pednekars film collects दोन दिवसात 'बाला' चित्रपटाने कमवले इतके कोटी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/11/10231542/Capture-bala-new.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : प्रदर्शना अगोदर वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'बाला' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. या सिनेमेने गेल्या दोन दिवसात 25 कोटी 88 लाखांची कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 10 कोटी 15 लाखांची कमाई केली आहे.
चित्रपट निर्माते दिनेश विजन आणि दिग्दर्शक अमर कौशिक बाला चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले आहे.या अगोदर त्यांनी 'स्त्री' चित्रपटात एकत्र काम केले होते. 'बाला' चित्रपटामध्ये आयुष्यमान खुराणा, यामी गौतम आणि भूमी पेडणेकर मुख्य भूमिकेत आहे. 'बाला' चित्रपटाचा एकूण बजेट 25 कोटी होता. हा बजेट दोनच दिवसांत चित्रपटाने वसूल केला आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 15 कोटी 88 लाख कमवले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी हे आकडे शेअर केले आहेत.
https://twitter.com/taran_adarsh/status/1193402455519707136
राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता आयुष्यमान खुरानाचे आर्टिकल 15, ड्रीमगर्ल आणि बाला हे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहे. या तीनही चित्रपटात आयुष्यमानचे भूमिकेच कौतुक झालं आणि आता बाला बनून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. आयुष्मानचे अलीकडचे सहाही चित्रपट 100 कोटींच्या घरात गेलेले आहेत. ‘बरेली की बर्फी’पासून सुरु झालेली ही मालिका ‘शुभ मंगल सावधान’, अंधाधुन, बधाई हो, आर्टिकल 15 ते ड्रीम गर्ल पर्यंत सुरूच आहे. आता बाला सुद्धा ही मालिका पुढे सुरु ठेवेल हीच त्याची अपेक्षा असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)