एक्स्प्लोर

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दिकींची हत्या, जिगरी दोस्त संजय दत्त तातडीने लिलावती रुग्णालयात पोहोचला

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींच्या हत्यनेनंतर त्यांचा खास मित्र संजय दत्तही लिलावती रुग्णालयात पोहचला.

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ माजली आहे. बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटात प्रवेश केला होता. पण दसऱ्याच्या दिवशी मुंबईतील वांद्रे परिसरातील त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोरच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यानंतर बाबा सिद्दीकी यांच्या लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा खास मित्र संजय दत्तही (Sanjay Dutt) रुग्णालयात पोहचला. 

संजय दत्त आणि बाबा सिद्दीकी हे खास मित्र होते. बाबा सिद्दीकी हे मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्याचदरम्यान वांद्र्यात त्यांची आणि संजय दत्तची ओळख झाली होती. त्यांनंतर त्यांच्या घनिष्ठ मैत्रीही झाली. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तारलाही संजय दत्त आवर्जुन हजर राहायचा. दरम्यान त्यांच्या हत्येच्या बातमीनंतरही संजय दत्त रुग्णालयात पोहचल्याचं पाहायला मिळालं. 

बाबा सिद्दीकी कोण होते?

बाबा सिद्दीकी यांनी 1977 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी त्यावेळच्या विविध विद्यार्थ्यांच्या चळवळींमध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या मुंबई चॅप्टरचे सदस्य म्हणून भाग घेतला,जी काँग्रेसची विद्यार्थी शाखा होती. 1980 मध्ये ते वांद्रे युवक काँग्रेसच्या वांद्रे तालुक्याचे सरचिटणीस बनले आणि पुढील दोन वर्षांत त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.1988 मध्ये ते मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. चार वर्षांनंतर त्यांची मुंबई महानगरपालिकेत नगरपरिषद म्हणून निवड झाली आणि पाच वर्षांनंतर त्यांची पुन्हा या पदावर निवड झाली.  

झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जात होते. पण बाबा सिद्दीकी यांनी 10 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हे काँग्रेसच्या तिकीटावर तीन वेळा ते आमदार झाले आहेत. त्याशिवाय मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय.वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 1999 मध्ये ते आमदार झाले. 2004 आणि 2009 मध्ये ते पुन्हा निवडून आले. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत.  बाबा सिद्दीकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते.

ही बातमी वाचा : 

CM Eknath Shinde on Baba Siddique Death : बाबा सिद्दिकींची मुंबईत गोळ्या झाडून हत्या, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Baba Siddque | बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, फडणवीस थेट लीलावती रुग्णालयातBaba Siddique Dead Update | बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात बिश्नाई गँगच्या अॅगलने पोलिसांचा तपास सुरुEknath Shinde On Baba Siddique Dead | बाबा सिद्दीकींच्या आरोपींना कडक कारवाई होईल- एकनाथ शिंदेBaba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Embed widget